Home /News /money /

Bank Holidays: जुलैमध्ये बँका 31 पैकी 14 दिवस बंद राहणार, संपूर्ण यादी पाहा

Bank Holidays: जुलैमध्ये बँका 31 पैकी 14 दिवस बंद राहणार, संपूर्ण यादी पाहा

रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षात बँकांमधील सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तरावरील असतात, जेव्हा देशभरात बँकिंग सेवा बंद असतात.

    मुंबई,  1 जुलै : तुमचं बँकेत (Bank) काही काम असेल आणि तुम्हालाही जुलैमध्ये बँकेत जाण्याची गरज वाटत असेल, तर तुमच्या बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी जुलै महिन्यात बँकेला (Bank Holidays in July) किती दिवस सुट्ट्या असतील हे जाणून घ्या. रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार जुलै महिन्यात एकूण 14 दिवस बँकांमध्ये कोणतंही काम होणार नाही. ऑनलाइन बँकिंग (Online Banking) सेवांचा विस्तार झाल्यानंतर, ग्राहकांसाठी बँकेची कामं खूप सोयीस्कर झाली आहेत. त्यामुळे आता त्यांना प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. परंतु अजूनही चेकबुक, पासबुक (Passbook), ड्राफ्ट यासारख्या सेवांशी संबंधित अशी अनेक कामं आहेत, जी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावं लागतं. अशा परिस्थितीत तुम्हालाही या महिन्यात बँकेत काही काम असेल तर तिथं जाण्यापूर्वी बँकेत सुट्ट्या आहेत की नाही हे नक्की पहा. रिझर्व्ह बँक ठरवते सुट्टीची तारीख रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षात बँकांमधील सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तरावरील असतात, जेव्हा देशभरात बँकिंग सेवा बंद असतात. तर, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावरच्या असतात. ज्यामुळे संबंधित राज्यांमध्ये बँकेच्या शाखा बंद असतात. वेगवेगळ्या राज्यांसाठी सुट्ट्यांची यादीही वेगळी असते. बँकेच्या सुट्ट्या असतात तीन प्रकारच्या आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकांमधील सुट्ट्यांची यादी तीन प्रकारच्या सुट्ट्यांच्या आधारे तयार केली जाते. पहिली म्हणजे हॉलिडे अंडर निघोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट (Holiday under Negotiable Instruments Act), दुसरी हॉलिडे अंडर निघोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट अँड रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे (Holiday under Negotiable Instruments Act and Real-Time Gross Settlement Holiday) आणि तिसरी बँक क्लोजिंग ऑफ अकाउंट (Banks’ Closing of Accounts) म्हणजे बँकांची खाती बंद करण्याची सुट्टी. या शिवाय विविध सण आणि इतर प्रसंगीही बँकांचं कामकाज बंद असतं. जुलैमध्ये बँका कधी राहतील बंद 1 जुलै: कांग (रथजत्रा) / रथयात्रा - भुवनेश्वर आणि इंफाळमध्ये बँका बंद राहतील. 3 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी). 7 जुलै: खर्ची पूजा – आगरतळ्यात बँका बंद राहतील. 9 जुलै: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), ईद-उल-अदा (बकरीद) 10 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी) 11 जुलै: जम्मू आणि श्रीनगरमध्ये इज-उल-अदानिमित्त बँका बंद राहतील. 13 जुलै: भानू जयंती- गंगटोकमध्ये बँका बंद राहतील. 14 जुलै: बेन डिएनखलाम - शिलाँगमध्ये बँका बंद राहतील. 16 जुलै: हरेला-डेहराडूनमध्ये बँका बंद राहतील. 17 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी) 23 जुलै: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार) 24 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी) 26 जुलै: केर पूजा- आगरतळामध्ये बँका बंद राहतील. 31 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी) ही आहे जुलै महिन्यातील बँकांची यादी. तुम्हीही या महिन्यात बँकेच्या कामांसाठी जाणार असाल तर तुमच्या बँकेच्या शाखेत सुट्टी आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या.
    First published:

    Tags: Bank details, Bank holidays, Money

    पुढील बातम्या