मराठी बातम्या /बातम्या /मनी /Bank Holiday: जुलैमध्ये एकूण 15 दिवस बंद राहतील बँका, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday: जुलैमध्ये एकूण 15 दिवस बंद राहतील बँका, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

जुलै महिन्यात (July 2021) एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) दर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

जुलै महिन्यात (July 2021) एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) दर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

जुलै महिन्यात (July 2021) एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) दर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

नवी दिल्ली, 24 जून: पुढील महिन्याच अर्थात जुलै 2021 मध्ये तुमचं बँकेमध्ये काही महत्त्वाचं काम असेल तर तत्पूर्वी सुट्ट्यांची यादी तपासूनच बँकेत जाण्याची योजना आखा. कारण जर सुट्टीच्या दिवशी तुम्ही बँकेत पोहोचलात तर कामाचा खोळंबा होऊ शकतो.  जुलै महिन्यात (July 2021) एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) दर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर (Bank holidays list) केली जाते. प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.  दर महिन्याला साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त इतरही काही सुट्ट्या (Bank holidays)  बँक कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगळ्या असतात. एखाद्या राज्यात एखाद्या सणसमारंभाची सुट्टी असेल तर ती सुट्टी दुसऱ्या राज्यात असेलच असं नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI Reserve Bank of India) वेबसाइटनुसार या महिन्यातही देशातील वेगवेगळ्या राज्यात काही वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत.

हे वाचा-सलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं

जुलै 2021 मध्ये सणसमारंभानिमित्त 9 सुट्ट्यात आहेत तर या व्यतिरिक्त 6 सुट्ट्या या साप्ताहिक सुट्ट्या आहेत. अशाप्रकारे एकूण 15 सुट्ट्या पुढील महिन्यात असणार आहेत. असं असलं तरी प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

जुलैमध्ये कोणत्या दिवशी बंद राहणार बँका (Bank holiday list in July 2021)

>> 4 जुलै 2021 - रविवार

>> 10 जुलै 2021 - दूसरा शनिवार

>> 11 जुलै 2021 - रविवार

>> 12 जुलै 2021 - सोमवार - कांग (राजस्थान), रथ यात्रा (भुवनेश्वर, इम्फाळ,)

>> 13 जुलै 2021 - मंगळवार - भानू जयंती (शहीद दिवस- जम्मू आणि कश्मीर, भानू जयंती–सिक्किम)

>> 14 जुलै 2021 - द्रुकपा त्शेची (गंगटोक)

>> 16 जुलै 2021- गुरुवार - हरेला पूजा (देहरादून)

>> 17 जुलै 2021 - खारची पूजा (आगरतळा, शिलाँग)

>> 18 जुलै 2021 - रविवार

हे वाचा-... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम

>> 19 जुलै 2021 - Guru Rimpoche’s Thungkar Tshechu(गंगटोक)

>> 20 जुलै 2021 - मंगळवार - ईद अल अधा (देशभर सुट्टी)

>> 21 जुलै 2021 - बुधवार - बकरी ईद (देशभर सुट्टी)

>> 24 जुलै 2021 - चौथा शनिवार

>> 25 जुलै 2021 - रविवार

>> 31 जुलै 2021- शनिवार - केर पूजा (आगरतळा)

तपासा आरबीआयची अधिकृत वेबसाइट

तुम्ही सर्व सुट्ट्यांची यादी तपासण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx भेट देऊ शकता. याठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

First published:

Tags: Bank, Bank holidays