मुंबई, 31 जानेवारी: पगार आणि आर्थिक व्यवहार यांसंबधी व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमची बँकेतील महत्त्वाची कामं आज जर आज अपूर्ण राहिली असतील, तर ही कामं पूर्ण करण्यासाठी आणखी 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी हे दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहेत. त्यानंतर आलेल्या रविवारमुळे सलग 3 दिवस बँका बंद राहतील. या कालावधीमध्ये ग्राहकांना केवळ ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध असेल. 3 दिवस सलग बँका बंद राहिल्यानं ATM यंत्रणेवरही ताण येण्याची शक्यता आहे. आपल्या काही मागण्यांसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. याआधी 8 जानेवारीला भारत बंदला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र वेगवेगळ्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.
देशव्यापी संपामुळे बँका आणि कार्यालयांचं कामकाज विस्कळित होऊ नये यासाठी हरतऱ्हेचे उपाय करण्यात आलेत. पण तरीही बंदचा परिणाम होऊ शकतो. पगारवाढीबद्दल बँक कर्मचारी संघटना आणि सरकारची चर्चा समाधानकारक झाली नाही. त्यामुळे हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
संपात कोणाचा सहभाग?
इंडियन बँक असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 9 संघटनांचा सहभाग असलेल्या युनायडेट फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटनांचा यामध्ये समावेश आहे.
(हेही वाचा : सोन्याला पुन्हा झळाळी, लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ )
ग्राहकांवर काय होणार परिणाम?
या कालावधीमुळे ग्राहकांना फक्त ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येणार आहे. 3 दिवस बँका बंद असल्याने डीडी आणि चेक क्लीअर होणार नाही. त्यामुळे पैशांसाठी ATM सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ शकते. त्यामुळे या सेवेवर ताण पडू शकतो.
(हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला चाप, LPG गॅसची किंमत भडकणार? )
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.