PMC सारखी बँक गोत्यात आली तर खातेदारांच्या पैशाचं काय होतं?

PMC सारखी बँक गोत्यात आली तर खातेदारांच्या पैशाचं काय होतं?

PMC बँकेच्या खातेदारांवर आर्थिक संकट आल्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या बँकांबदद्ल अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर काही बँकांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PMC बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले. त्यानंतर सोशल मीडियावर बँकेच्या खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण तज्ज्ञांच्या मते, बँकेत जमा केलेले खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत.स्वातंत्र्यानंतर कोणतीही व्यावसायिक बँक डुबलेली नाही. अशा स्थितीत सरकार सामान्य माणसाच्या मदतीला धावून येतं.

बँकेत जमा केलेल्या पैशांवर 1 लाख रुपयांची सुरक्षा गॅरंटी मिळते. सोप्या भाषेत सांगायचं तर बँकेमध्ये तुमचे 4 लाख रुपये असतील आणि बँक दिवाळखोरीत निघाली तर 1 लाख रुपये सुरक्षित असतात. बाकीच्या पैशांची हमी मिळत नाही. ही सुरक्षित रक्कम कशा पद्धतीने मिळेल हेही नंतर ठरवलं जातं. एखाद्या बँकेचं आर्थिक नुकसान झालं तर ती बँक दुसऱ्या बँकेत विलीन केली जाते. त्यामुळे खातेदारांचं नुकसान होत नाही.

अफवांचा सुळसुळाट

PMC बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यामुळे खातेदार त्यांच्या खात्यातून 10 हजार रुपयेच काढू शकतात. PMC बँकेच्या खातेदारांवर हे आर्थिक संकट आल्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या बँकांबदद्ल अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर काही बँकांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय.

(हेही वाचा : PMC बँक घोटाळा : HDILच्या संचालकांना अटक, 3500 कोटींची मालमत्ता गोठवली)

SBI चे माजी अध्यक्ष प्रदीप चौधरी यांच्या मते, बँकांचे गैरव्यवहार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळेच खातेदारांमध्ये चिंतेचं असणं स्वाभाविकच आहे. अशा बँकांवर RBI ने कडक कारवाई केली पाहिजे.

देशात रेस्टॉरंट उघडणं हे बँक सुरू करण्यापेक्षाही सोपं झालं आहे, असं ते म्हणाले.

==============================================================================================

VIDEO : रोहित आमदार होणार? मिसेस पवार यांची भावुक प्रतिक्रिया

Published by: Arti Kulkarni
First published: October 3, 2019, 8:42 PM IST
Tags: moneyPMC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading