मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँक खात्यापासून म्युच्युअल फंडपर्यंत नॉमिनी का महत्त्वाचा?

बँक खात्यापासून म्युच्युअल फंडपर्यंत नॉमिनी का महत्त्वाचा?

बँक खात्यांमधून सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर नॉमिनीचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे.

बँक खात्यांमधून सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर नॉमिनीचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे.

बँक खात्यांमधून सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर नॉमिनीचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई: कुठलंही खातं असो पहिल्यांदा आपल्याला नॉमिनी भरणं गरजेचं असतं. त्याशिवाय बऱ्याचदा काही गोष्टी अडून राहतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशभरातील बँकांमध्ये हजारो कोटी रुपये बेवारस पडून आहेत. याचं कारण म्हणजे नॉमिनी न ठेवल्यामुळे. या निधीवर कोणीही दावा केलेला नाही.

त्यामुळे बँक खात्यांमधून सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर नॉमिनीचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक वेळा ग्राहक आपल्या बँक खात्यात किंवा इतर कोणत्याही योजना किंवा फंडात गुंतवणूक करताना काही कारणास्तव नामिनीच्या नावाचा उल्लेख करत नाहीत. असे न केल्यास आगामी काळात आपल्या कुटुंबासमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

बँक खातेदार किंवा गुंतवणूकदारचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे मिळवण्यासाठी आणि ते नॉमिनी आहेत हे सादर करण्यासाठी बरेच उपदव्याप करावे लागतात. त्यातही अडचणी आल्या तर ते पैसे मिळत नाहीत.

तुम्ही बँक खात्यात किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीत नॉमिनीचे नाव नमूद केले नसेल तर तुम्हीही लवकरात लवकर नॉमिनीचे नाव जोडा. आजच्या काळात म्युच्युअल फंड, एफडी, पीएफ खाते, पोस्ट ऑफिस योजना, एलआयसी पॉलिसी आदी योजनांमध्ये गुंतवणूक करताना नॉमिनीचे नाव नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. यासोबतच शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी डिमॅट खात्यात नामिणीचे नाव टाकणेही आवश्यक आहे.

काय असतं नॉमिनी?

खातेदार, म्युच्युअल फंड गुंतवणूकदार, लॉकरधारक, शेअर बाजारातील गुंतवणूकदार यांच्या मृत्यूनंतर त्या खात्यात असलेल्या रकमेवर नॉमिनी हक्क सांगू शकते. यासाठी त्या व्यक्तीचं नाव नॉमिनीमध्ये असणं आवश्यक आहे. तुम्ही नॉमिनी कुणालाही ठेवू शकता. आई वडील, जवळची व्यक्ती, पती-पत्नी किंवा नातेवाईकांपैकी कोणीही ठेवता येतं.

जेव्हा तुम्ही नवीन बँक खाते उघडता किंवा एखाद्या योजनेत गुंतवणूक करता. मग तुम्हाला खाते उघडण्यासाठी फॉर्म दिला जातो. या फॉर्ममध्ये तुम्हाला नॉमिनी देखील भरायचं असतं. काही योजनांमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त नॉमिनी ठेवण्याची सूट दिली जाते.

नॉमिनेशन्स करताना नॉमिनीचं पूर्ण नाव, त्याचं वय, पत्ता आणि आपल्याशी असलेलं नातं यांचा उल्लेख फॉर्ममध्ये करावा. नॉमिनी अल्पवयीन असल्यास, एखाद्या वृद्ध व्यक्तीला नॉमिनेट करा आणि त्याचे संपूर्ण नाव, वय, पत्ता आणि नॉमिनीशी असलेल्या नात्याचा उल्लेख करा.

जर एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला असेल आणि त्याने नॉमिनीचा उल्लेख केला असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा आयडी सबमिट केल्यानंतरच कुटुंबाला निधी मिळतो. पण उमेदवारी न मिळाल्यास कुटुंबाला वारसदार प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून जावे लागते.

First published:

Tags: Bank services