मराठी बातम्या /बातम्या /मनी /आधार लिंक करताना या कारणामुळे आहे बँक खातं रिकामं होण्याची भीती! जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

आधार लिंक करताना या कारणामुळे आहे बँक खातं रिकामं होण्याची भीती! जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च 2021 निश्चित केली आहे. दरम्यान हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की हे काम पूर्ण करताना तुम्ही फसवणुकीचे शिकार तर होत नाहीत ना.

केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च 2021 निश्चित केली आहे. दरम्यान हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की हे काम पूर्ण करताना तुम्ही फसवणुकीचे शिकार तर होत नाहीत ना.

केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च 2021 निश्चित केली आहे. दरम्यान हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की हे काम पूर्ण करताना तुम्ही फसवणुकीचे शिकार तर होत नाहीत ना.

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर:  सर्व बँक खाती आधार क्रमांकाशी लिंक करणे (Bank Account-Aadhaar Linking) अनिवार्य आहे. हे काम पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारने 31 मार्च 2021 ही डेडलाइन देखील निश्चित केली आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला आधार आणि बँक खाते लिंक करता येईल. मात्र हे महत्त्वाचे काम पूर्ण करताना तुम्हाला सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण बँक खाते आणि आधार क्रमांक लिंक करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. बनावट फोन कॉलच्या माध्यमातून बऱ्याचदा ग्राहकांना फसवले जात आहे. स्वत:ला बँकेचे अधिकारी भासवून हे भामटे ग्राहकांशी संवाद साधतात आणि त्यांच्याकडून बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी वैयक्तिक तसंच बँकिंग संबंधित माहिती मागून घेतात. तुम्ही जर अशी चूक केली तर तुमचे खाते रिकामे होऊ शकते.

कुठे मिळेल योग्य माहिती?

हे काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बनावट फोन कॉलच्या जाळ्यात न अडकणं आवश्यक आहे. बँक खाते-आधार क्रमांक लिंक करण्याची माहिती तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देखील मिळेल. बँकेच्या शाखेत देखील तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. बँकेकडून किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारचा कोणताही फोन कॉल येत नाही, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. अशाप्रकारे कोणता कॉल आल्यास त्वरित बँकेत सूचना करा.

असं तपासा तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे की नाही?

-सर्वात आधी UIDAI च्या uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा

-याठिकाणी ‘Aadhaar Services’ वर क्लिक करा

(हे वाचा-Aadhaar PVC card: असं बनवा ATM सारखं दिसणार आधार कार्ड, ऑनलाइन करा ऑर्डर)

-तुमचे आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याठिकाणी ‘Check Aadhaar & Bank Account Linking Status’ असा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा.

-नवीन पेज ओपन झाल्यावर तिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा

-त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा सिक्योरिटी कोड टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी एंटर करून लॉग इन करा.

-जर तुमचे खाते आधार क्रमांकाशी लिंक झाले असेल तर तुम्हाला स्क्रीनवर असा मेसेज दिसेल-  “Congratulations! Your Bank Aadhaar Mapping has been done”.

बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसल्यास काय कराल?

-इंटरनेट बँकिंग वापरून तुमच्या बँकिंग सर्व्हिसमध्ये लॉग इन करा, तिथे तुम्हाला आधार क्रमांक लिंक करण्याचा पर्याय दिसेल.

-तुम्ही एसबीआय ग्राहक असाल तर  www.onlinesbi.com वर लॉग इन करून झाल्यानंतर “My Accounts” या पर्यायाअंतर्गत तुम्हाला “Link your Aadhaar number” असा पर्याय मिळेल.

(हे वाचा-Gold Investment: बँकेतून सोन्याची नाणी खरेदी करणं टाळा, वाचा काय आहे कारण)

-याठिकाणी तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. यावेळी तुमच्या मोबाइल क्रमांकाचे लास्ट दोन डिजिट्स देखील दिसतील.

-आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक झाल्याचे तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर SMS च्या माध्यमातून तुम्हाला समजेल.

-तुम्ही ऑनलाइन बँकिंग सेवा वापरत नसाल तर ऑफलाइन मार्गाने जवळच्या बँक शाखेत जाऊन तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. एका फॉर्मबरोबर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी द्यावी लागेल. खाते आधार क्रमांकाशी लिंक झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर SMS येईल.

First published:

Tags: Aadhar card