मुंबई, 7 फेब्रुवारी: तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून चांगले व्याज मिळवायचे असेल तर तुम्ही बँकेच्या FD योजनेत गुंतवणूक करू शकता. खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने त्यांच्या मुदत ठेवी म्हणजेच FD व्याजदरात 0.50 टक्के वाढ केली आहे. यामुळे गुंतवणुकदारांना मोठा फायदा होणार आहे. जाणून घ्या बँकेने किती वाढ केली.
बंधन बँकेने सांगितले की, आता ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के व्याजाचा लाभ मिळेल. तर सर्वसामान्य ग्राहकांना बँकेत FD वर 8 टक्के व्याज मिळणार आहे. व्याजात वाढ केल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना 600 दिवसांच्या एफडीवर 8.5 टक्के आणि इतर नागरिकांना 8 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. त्याचप्रमाणे 1 वर्षाच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 7 टक्के करण्यात आला आहे. याचा अर्थ आता ज्येष्ठ नागरिकांना बंधन बँकेत 0.5 टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार आहे. बँकेने आजपासून हे नवे दर लागू केले आहेत.
आता बँक लोन मिळणे होणार सोपे! RBI गुडन्यूज देण्याच्या तयारीत
रेपो दर ठरवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे चलनविषयक धोरण समितीची बैठक आयोजित केली जाते. गेल्या वर्षी 2022 रोजी RBI ने रेपो दरात वाढ केली होती. याचाच परिणाम म्हणजे बँकांनी एफडीचे दर वाढवले. यानंतर बँकांमध्ये होम लोन आणि पर्सनल लोनचे व्याजदरही वाढवण्यात आले.
बंपर व्याज कमावण्याची संधी! आता FD मिळेल जवळपास 9% व्याजदर
यापूर्वी IDFC FIRST बँकेने फिक्स डिपॉजिटचे व्याजदर वाढवले होते. या बँकेत ज्येष्ठ नागरिकांना 18 महिने ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 8% व्याज मिळत आहे. तर जन स्मॉल फायनान्स बँकेनेही त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. जनता बँक आता 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 8.10 टक्के व्याज देतेय. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या एफडीवर 8.80 टक्के व्याज मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank details, Fixed Deposit