मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कमी भांडवलात जास्त नफा; 'या' व्यवसायात दिवसाला होईल 4000 रुपयांपर्यंतची कमाई

कमी भांडवलात जास्त नफा; 'या' व्यवसायात दिवसाला होईल 4000 रुपयांपर्यंतची कमाई

या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. अनेकांना अतिरिक्त उत्पन्नाची देखील अपेक्षा असते. त्यामुळे कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीतजास्त नफा मिळवणारा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : कोरोना (Covid 19) काळात नोकरी गेल्याने आज बरेच जण व्यवसायाकडे वळले आहेत. कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसाय (Business) लोक करत आहेत. या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. अनेकांना अतिरिक्त उत्पन्नाची देखील अपेक्षा असते. त्यामुळे कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीतजास्त नफा मिळवणारा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अनेक मोठ्या कंपन्या केळ्याचे चिप्स (Banana Chips) बनवत नाहीत. यामुळे तुम्ही याच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. उपवासामध्ये बटाट्याच्या चिप्सबरोबर केळ्याच्या चिप्सला देखील मोठी मागणी असते. केळ्याच्या चिप्सचे (Banana Chips) मार्केट खूप छोटं असल्यानं तुम्ही मार्केटमध्ये तुमचा ब्रँड तयार करून मोठा नफा मिळवू शकतात.

केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी गरजेचं साहित्य -

केळ्याचे चिप्स (Banana Chips) तयार करण्यासाठी प्रामुख्याने कच्ची केळी, तेल, मीठ, मसाले या साहित्याची गरज असते. याचबरोबर विविध प्रकारच्या मशीन देखील गरजेच्या आहेत. या मशीनची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केळ्याचे चिप्स (Banana Chips) तयार करण्यासाठी केळ्याचे साल काढणारी मशीन, केळ्याचे काप करणारी मशीन, तळणारी मशीन, मसाले एकत्र करणारी आणि पॅकिंग करणाऱ्या मशीनची गरज आहे.

मशीन कुठे मिळेल -

या मशीनची किंमत 28 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत आहे. यासाठी तुम्हाला 4 ते 5 गुंठ्यांची जागा गरजेची आहे. india.alibaba.com/index.html या वेबसाइटवरून तुम्ही या मशीनची खरेदी करू शकता.

(वाचा - Onion Price:मार्चपर्यंत रडवणार कांदा,पुरवठा घटल्याने दर कमी होण्याची शक्यता नाही)

50 किलो चिप्स बनवण्याचा खर्च -

50 किलो चिप्स तयार करण्यासाठी 120 किलो कच्च्या केळ्यांची आवश्यकता आहे. यासाठी 1 हजार रुपये खर्च येईल. याचबरोबर 12 ते 15 लिटर तेलासाठी 1050 रुपये खर्च करावे लागतील. याचबरोबर मशीनसाठी सरासरी 10 ते 11 लिटर डिझेलची गरज आहे. यामध्ये 900 रुपये खर्च होणार आहेत. याचबरोबर मीठ मसाल्यासाठी 150 रुपयांचा खर्च होणार आहे. हा सर्व खर्च 3200 रुपये होणार आहे. यामध्ये सर्व खर्च मिळून 1 किलो चिप्स 70 रुपयांत तयार होणार आहेत. बाजारात 90 ते 100 रुपये प्रतिकिलो विक्री करून तुम्ही यामधून नफा मिळवू शकता.

1 लाख रुपयांची कमाई होणार -

सर्वसाधारणपणे 1 किलो चिप्सच्या विक्रीवर 10 रुपये नफा गृहीत धरला तर तुम्ही साधारणपणे दिवसाला 4 हजार रुपयांची कमाई करू शकता. महिन्याला 25 दिवस तुमचा व्यवसाय सुरू राहिल्यास महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई करू शकता.

First published:

Tags: Business News