मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता India Post Payments Bank विमाही विकणार; बजाज अलियांझसोबत केली भागीदारी

आता India Post Payments Bank विमाही विकणार; बजाज अलियांझसोबत केली भागीदारी

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आता इन्शुरन्स प्रॉडक्ट्सही (Insurance products) विकणार आहे. यासाठी आयपीपीबीने बजाज अलियांझ लाईफ इन्शुरन्स (Bajaj Allianz Life insurance) कंपनीसोबत करार केला आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आता इन्शुरन्स प्रॉडक्ट्सही (Insurance products) विकणार आहे. यासाठी आयपीपीबीने बजाज अलियांझ लाईफ इन्शुरन्स (Bajaj Allianz Life insurance) कंपनीसोबत करार केला आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आता इन्शुरन्स प्रॉडक्ट्सही (Insurance products) विकणार आहे. यासाठी आयपीपीबीने बजाज अलियांझ लाईफ इन्शुरन्स (Bajaj Allianz Life insurance) कंपनीसोबत करार केला आहे.

    मुंबई, 12 नोव्हेंबर : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आता इन्शुरन्स प्रॉडक्ट्सही (Insurance products) विकणार आहे. यासाठी आयपीपीबीने बजाज अलियांझ लाईफ इन्शुरन्स (Bajaj Allianz Life insurance) कंपनीसोबत करार केला आहे. गुरुवारी (11 नोव्हेंबर) या पार्टनरशीपबाबत (Bajaj and IPPB partnership) घोषणा करण्यात आली. यानंतर आता बँकेच्या 650 शाखा आणि 1,36,000 हून अधिक अॅक्सेस पॉइंट्सवर ग्राहकांना टर्म आणि अॅन्युइटी प्रॉडक्ट्स मिळणार आहेत. आयपीपीबीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ जे. वेंकटरामु, बीएएएलआयसीचे एमडी आणि सीईओ तरुण चुघ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका व्हर्चुअल पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली.

    या भागीदारीमधून दोन प्रकारचा विमा (IPPB insurances) देण्यात येणार आहे. बजाज अलियांझ लाइफ स्मार्ट प्रोटेक्ट गोल (Bajaj allianz life smart protect goal) आणि बजाज अलियांझ लाईफ गँरंटीड पेन्शन गोल (bajaj Allianz life guaranteed pension goal) असे हे टर्म आणि अॅन्युइटी प्रॉडक्ट्स आहेत. यातला पहिला लाईफ स्मार्ट प्रोटेक्ट गोल ही घरातल्या कमावत्या सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबाला तात्काळ आर्थिक साह्य देण्यासाठी तयार करण्यात आलेली मूल्यवर्धित आणि सर्वसमावेशक योजना आहे. दुसरीकडे बजाज अलियांझ लाइफ गँरंटीड पेन्शन गोलचं उद्दिष्ट निवृत्तीनंतरच्या खर्चाची पूर्तता करणं हे आहे. ही योजना व्यक्ती जिवंत असेपर्यंत हमी आणि निश्चित नियमित उत्पन्न प्रदान करते. या दोन्ही योजना टपाल विभागाच्या सध्याच्या पीएलआय आणि आरपीएलआय या दोन्ही योजनांव्यतिरिक्त ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

    पोस्ट विभागाचे सचिव विनीत पांडे म्हणाले, “ज्या लाखो लोकांना विमा आणि इतर आर्थिक सुविधा सहजपणे उपलब्ध होत नाहीत त्यांचं जीवन सुधारण्यासाठी इंडिया पोस्ट (India post life insurance) प्रतिबद्ध आहे. ही भागीदारी ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टं सर्वसमावेशक पद्धतीने व्यवस्थापित करण्यास सक्षम करेल. ग्राहक त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पोस्ट विभागाच्या बचत उत्पादनांचा, तसंच या मुदत आणि वार्षिकी विमा उत्पादनांचा लाभ घेणं सुरू ठेवू शकतात.”

    या वेळी बोलताना वेंकटरामू म्हणाले, “अलीकडच्या काळात आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी एक महत्त्वाचं गुंतवणूक साधन म्हणून लोक विम्याकडे पाहत आहेत. आयपीपीबी ही आधीपासूनच आपल्या ग्राहकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) देत आहे. एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा जाळं निर्माण करण्याच्या आणि वंचित घटकांसाठी विमा परवडण्यायोग्य बनवण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत अशी ही योजना आहे.”

    “या टर्म आणि अॅन्युइटी विमा उत्पादनांमुळे आमचे बजाज अलायंझ लाइफसोबतचे यशस्वी संबंध आणखी विस्तारले आहेत. बँकिंग टच पॉइंट्स आणि ग्रामीण टपाल सेवक आणि पोस्टमनच्या आमच्या विस्तीर्ण नेटवर्कद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वसमावेशक आर्थिक उपाय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असंही वेंकटरामू या वेळी म्हणाले.

    First published:
    top videos