Success Story : एकेकाळी शिक्षक असलेले बैजू रवींद्रन असे बनले अब्जाधीश!

Success Story : एकेकाळी शिक्षक असलेले बैजू रवींद्रन असे बनले अब्जाधीश!

ही कहाणी आहे,भारतातल्या एका नव्या अब्जाधीशाची. शिक्षक असलेले बैजू रवींद्रन 'थिंक अँड लर्न'या कंपनीच्या माध्यमातून ते लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी काढलेलं 'बैजू'लर्निंग अ‍ॅपही चांगलंच लोकप्रिय आहे.

  • Share this:

मुंबई,30 जुलै : ही कहाणी आहे,भारतातल्या एका नव्या अब्जाधीशाची. एकेकाळी शिक्षक असलेले बैजू रवींद्रन आता अब्जाधीश आहेत. 'थिंक अँड लर्न'या कंपनीच्या माध्यमातून ते लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी काढलेलं 'बैजू'लर्निंग अ‍ॅपही चांगलंच लोकप्रिय आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, रवींद्रन यांच्या 'थिंक अँड लर्न' या कंपनीने जुलै 2019 मध्ये 15 कोटी डॉलर्सचा फंड जमवला होता. रवींद्रन यांच्याकडे कंपनीचे 21 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स आहेत. याशिवाय त्यांनी बैजू हे लर्निंग अ‍ॅप लाँच केलं होतं.

'बैजू' अ‍ॅपचे जगभरात साडेतीन कोटी युजर आहेत. त्याचबरोबर 24 लाख पेड सबस्क्राइबरही आहेत.

रवींद्रन यांचा जन्म दक्षिण भारताततल्या एका किनारपट्टीवरच्या गावातला. त्यांचे आईवडील शिक्षक होते. तरीही त्यांचं मन काही शाळेत लागत नव्हतं. ते अनेक तास फूटबॉल खेळत असायचे. मग रात्री घरी येऊन परत अभ्यास करायचे. एवढं करूनही ते इंजिनिअर झाले आणि या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मदत करू लागले.

(खरं की खोटं? मांसाच्या तुकड्याने प्लेटमधून मारली उडी, VIDEOव्हायरल )

या सगळ्या खटाटोपात बैजू रवींद्रन यांचे विद्यार्थी वाढत गेले. मग त्यांनी स्टेडियममध्ये एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. बैजू रवींद्रन यांना इंजिनिअरिंगच्या मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवायचं आहे. त्यांच्या लर्निंग अ‍ॅपमध्ये 'द लायन किंग' किंवा सिम्बाच्या मदतीने गणित आणि इंग्रजी शिकवलं जातं. मुलांना या विषयाची गोडी लागावी यासाठी मनोरंजक पद्धतीनेच त्यांना हे विषय शिकवावे लागतील, असं त्यांचं म्हणणं आहे.

बैजू रवींद्रन अवघ्या 37 वर्षांचे आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत, सध्याच्या हायटेक जमान्यात त्यांनी काढलेलं अ‍ॅप यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. दक्षिण भारतातल्या एका छोट्याशा गावातून येऊन त्यांनी काढलेल्या या कंपनीची कहाणी खरंच प्रेरणादायी आहे. आता ते अब्जाधीश आहेत आणि कंपनीचा टर्नओव्हरही मोठा आहे पण शिक्षणाच्या कार्यातून मिळालेलं विद्यार्थ्यांचं समाधान हीच माझी खरी कमाई आहे, असं ते सांगतात.

=================================================================================================

VIDEO: रोहितसोबत वादावर विराट पहिल्यांदाच बोलला, टीकाकारांना दिलं ओपन चॅलेंज

Published by: Arti Kulkarni
First published: July 30, 2019, 6:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading