मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पतंजली आयुर्वेद देणार रोजगाराची नवी संधी; 5 लाख नोकऱ्या देणार असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा

पतंजली आयुर्वेद देणार रोजगाराची नवी संधी; 5 लाख नोकऱ्या देणार असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा

बाबा रामदेव (Baba Ramdev) 5 लाख तरुणांना रोजगार देणार आहेत. असा दावा त्यांनी केला आहे.

बाबा रामदेव (Baba Ramdev) 5 लाख तरुणांना रोजगार देणार आहेत. असा दावा त्यांनी केला आहे.

बाबा रामदेव (Baba Ramdev) 5 लाख तरुणांना रोजगार देणार आहेत. असा दावा त्यांनी केला आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 14 नोव्हेंबर: कोरोनापासून निवडणुकीपर्यंत, व्यवसायापासून परदेशासोबतच्या नीतीपर्यंत योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी न्यूज 18 हिंदीशी विशेष बातचीत केली. या मुलाखतीदरम्यान बाबा रामदेव यांनी सांगितलं, 'मी आणि आमची संस्था लोकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी प्रयत्न करत आहोत.' बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे, येत्या काळात बाबा रामदेव 5 लाख तरुणांना रोजगार देणार असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी दिली आहे. ‘पतंजलीचा टर्नओव्हर 25 हजार कोटी होणार’ व्यवसायाबद्दल बोलताना बाबा रामदेव म्हणले, 'भारताबाहेरच्या कंपन्या आपल्या देशाला लूटत आहेत. जी लोकं ऑक्सफर्ड, हॉर्वर्ड आणि केंम्ब्रिज विद्यापीठामधून शिकून आले आहेत त्यांना हा बाबा रामदेव स्वत:च्या गुरुकूलमध्ये शिकवणार आहे. यावर्षी पतंजली कंपनीचा टर्नओव्हर 25 हजार करोड होणार आहे.’ असं भाकितही बाबा रामदेव यांनी केलं आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अनेकांनी स्वत:च्या नोकऱ्या गमवल्या आहेत. पण यामुळे निराश न होता स्वत:चा उद्योग सुरू करा, स्वदेशी जीवनपद्धती स्वीकारा असं आवाहन बाबा रामदेव यांनी लोकांना केलं आहे. ‘MNC सांस्कृतीक आणि आर्थिक गुलामी योग्य नाही. आपल्याला साम्राज्यवाद झुगारुन द्यायचा असेल तर स्वदेशी जीवन पद्धतीचा मार्ग अवलंबल्याशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले.’ चिनी वस्तू खरेदी करणाऱ्यांना योग गुरू बाबा रामदेव यांनी आठवण करुन दिली की, फटाक्यांपासून मोबाईलपर्यंत जी लोकं चायनिज मालावर अवलंबून आहेत ती दहशतवादाला पाठिंबा देत आहेत. कारण तुमच्या पैशांमुळे चीनचा नफा होतो. आणि तो पैसा चीन पाकिस्तानला देतो. पाकिस्तानचे दहशतवादी आपल्याच देशातील अशांतता पसरवत आहेत.
First published:

Tags: Baba ramdev

पुढील बातम्या