Home /News /money /

मंदिराला एका वर्षात बकऱ्यांनी मिळवून दिले 1,32,00,000 रुपये

मंदिराला एका वर्षात बकऱ्यांनी मिळवून दिले 1,32,00,000 रुपये

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मंदिराच्या उत्पन्नात वाढ झाली असून यावर्षी बकऱ्यांच्या लिलावातून 1 कोटी 32 लाख रुपये मंदिराला मिळाले आहेत.

    धर्मशाला, 31 जानेवारी : हिमाचल प्रदेशातील बाबा बालकनाथ मंदिराने बकऱ्यांच्या लिलावातून 1 कोटी 32 लाख रुपयांची कमाई केली आहे. या मंदिरात भक्तांकडून अर्पण करण्यात आलेल्या बकऱ्यांचा दरवर्षी लिलाव करण्यात येतो. त्यातून ही रक्कम मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, गेल्या एका वर्षात 6 हजार 371 बकऱ्यांच्या विक्रीतून मंदिराला 1 कोटी 32 लाख रुपये मिळाले आहेत. बाबा बालकनाथ मंदिरात भक्तांकडून शेळ्या, बकऱ्या अर्पण केल्या जातात. संस्थानकडून या शेळ्यांचा लिलाव दर आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी केला जातो.  2019 या एका वर्षात 6 हजारांहून अधिक शेळ्यांची विक्री झाली. यातून 1 कोटी 32 लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा यंदा जास्त पैसे लिलावातून मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2018 मध्ये 5 हजार 825 शेळ्यांची विक्री करण्यात आली होती. त्यातून 1 कोटी 20 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळाले होते. 2017 आणि 2018 च्या तुलनेत बकऱ्या अर्पण करणाऱ्यांची संख्या  2019 मध्ये वाढली असल्याची माहितीही विश्वस्तांनी दिली. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात हे मंदिर आहे. या ठिकाणी बाबा बालकनाथ यांचे मंदिर आहे. बाबा बालकनाथ यांनी अनेक वर्षे देवदसिध भागात एका झाडाखाली तपस्या केली होती. बाबा बालकनाथ यांच्याबद्दल अनेक दंतकथाही सांगितल्या जातात. त्यांचं एका राक्षसाशी युद्ध झालं होतं. तेव्हा शरण आलेल्या राक्षसाने त्यांच्या चरणाशी जागा मागितली. त्या राक्षसाच्या नावाने बकऱ्या अर्पण केल्या जातात. मात्र या बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा नसल्याचंही मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे. वाचा : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे! 0 डिग्रीत नवरदेव चालत पोहचला लग्न मंडपात
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Himachal pradesh

    पुढील बातम्या