देशातल्या बड्या IT उद्योगाची धुरा आता तरुण पिढीकडे; या कारणासाठी आहे नव्या चेअरमनकडे लक्ष

देशातल्या बड्या IT उद्योगाची धुरा आता तरुण पिढीकडे; या कारणासाठी आहे नव्या चेअरमनकडे लक्ष

विप्रोच्या अझीम प्रेमजी यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर या बड्या उद्योगाची धुरा मुलाच्या खांद्यावर आली आहे. त्यांच्या नेमणुकीकडे तरुण आयटी प्रोफेशन्सचं विशेष लक्ष आहे, याचं कारण चांगलं काम करणाऱ्या तरुण प्रोफेशनल्सना जास्त पगार किंवा इन्स्टेंटिव्ह द्यावीत, असं रिशद यांचं मत आहे.

  • Share this:

मुंबई, 6 जून : देशातल्या एका बड्या उद्योगाची सूत्र आता पुढच्या पिढीकडे जाणार आहेत. देशातल्या सॉफ्टवेअर उद्योगाला आकार आणि दिशा देणाऱ्यांमध्ये ज्यांचं नाव आघाडीवर आहे त्या विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांनी निवृत्ती घोषित केली आहे.   1.76 लाख कोटी मूल्याची भारतातली आघाडीची आयटी कंपनी असलेल्या विप्रो(Wipro)च्या मॅनेजमेंटमध्ये मोठा बदल होणार आहे. विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष अझीम प्रेमजी  (Azim Premji)यांनी आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता एवढ्या मोठ्या कंपनीची धुरा कोण सांभाळणार त्याकडे व्यापार जगाचं लक्ष लागलेलं होतं. अझीम प्रेमजी यांच्यानंतर त्यांचा मुलगा रिशद प्रेमजी (Rishad Premji)यांची पुढच्या 5 वर्षांसाठी विप्रोच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमन या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. 31 जुलैपासून ते कार्यभार सांभाळतील.

रिशद प्रेमजी 2007 पासून विप्रोचं काम बघत आहेत. त्यापूर्वी ते लंडनमधल्या एका बड्या कंपनीसाठी काम करत होते. GE कॅपिटलसाठीही त्यांनी काम केलं होतं. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेले रिशद IT आणि Finance क्षेत्रातलं मोठं नाव मानलं जातं. 2014 मध्ये त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लीडर पुरस्कारही देण्यात आला होता. ते NASSCOM या आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांच्या संघटनेचे अध्यक्षही राहिले आहेत.

आयटी क्षेत्रातल्या नोकरदारांचं का आहे लक्ष?

रिशद प्रेमजी यांच्या नेमणुकीकडे तरुण आयटी प्रोफेशन्सचं विशेष लक्ष आहे, याचं कारण चांगलं काम करणाऱ्या तरुण प्रोफेशनल्सना जास्त पगार किंवा इन्स्टेंटिव्ह द्यावीत, असं रिशद यांचं मत आहे. आपल्या कंपनीत आयटी क्षेत्रातलं उत्तम टॅलेंट यावं यासाठी त्यांचा प्रयत्न असेल, असं बोललं जातं. त्यामुळे विप्रोमधल्या नोकरभरतीच्या अटी किंवा संधी यात फरक पडू शकतो.

Union Budget 2019 : अर्थसंकल्पाबद्दल माहिती असायलाच हव्यात अशा 10 गोष्टी

रिशद प्रेमजी हे घराण्यातले तिसऱ्या पिढीचे उद्योजक ठरणार आहेत.

प्रेमजी कुटुंब मुळचं गुजराती असलं, तरी त्यांचं महाराष्ट्राशी जुनं नातं आहे. अझीम प्रेमजी यांचे वडील हुसेन हशम प्रेमजीसुद्धा व्यापारी होते. त्यांचा महाराष्ट्रात अंमळनेर इथे कारखाना होता. वनस्पती तेल, तूप, साबण अशा उत्पादनांचा तो कारखाना होता.

भाजपच्या जवळ असलेल्या या नेत्यावर EDचे छापे; शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घोटाळ्याचा आरोप

भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी हशम प्रेमजी यांना गुजराती मुस्लीम म्हणून तुम्ही पाकिस्तानात स्थायिक व्हा, असं आवाहन केलं होतं. पण प्रेमजी यांनी जिन्नांनी त्याबदल्यात दिलेली मोठी ऑफर नाकारून  मातृभूमी सोडून न जाण्याचा निर्णय घेतला.

VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा

First published: June 6, 2019, 8:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading