मुंबई, 17 नोव्हेंबर : देशातल्या सर्वांत वेगाने वाढणाऱ्या फंड हाउसेसपैकी एक असलेल्या अॅक्सिस म्युच्युअल फंडाने (Axis Mutual fund) ‘अॅक्सिस मल्टीकॅप फंड’ (Axis multi cap fund) ही आपली नवी फंड ऑफर जाहीर केली आहे. अनेक वैशिष्ट्य असलेला हा फंड 26 नोव्हेंबर 2021 रोजी लाँच होणार आहे. तसंच ही न्यू फंड ऑफर (New Fund Offer - NFO) 10 डिसेंबर 2021 रोजी बंद होणार आहे. हा एनएफओ गुंतवणूकदारांना लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देईल. यात प्रत्येक कॅटेगरीमध्ये किमान समान एक्स्पोजर असेल. या योजनेचं मॅनेजमेंट अॅक्सिस अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे फंड मॅनेजर अनुपम तिवारी आणि सचिन जैन यांच्याकडून केलं जाईल.
सेबीच्या (SEBI) नियमांनुसार, मल्टीकॅप फंडांना प्रत्येक मार्केट कॅपअंतर्गत कमीत कमी 25 टक्के एक्स्पोजरची आवश्यकता असते, जेणेकरून पोर्टफोलियो एखाद्या विशिष्ट मार्केट कॅपभोवती केंद्रित झालेला नसेल. व्यापक आणि वैविध्यपूर्ण गुंतवणूक पर्यायांमुळे मल्टीकॅप फंड गुंतवणूकदारांना विकास आणि जोखीम यांचं संतुलन साधून दुहेरी लाभ देतात. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि धनवृद्धीसाठी हे फंड्स चांगला पर्याय ठरतात.
अॅक्सिस एएमसीचा मल्टिकॅप दृष्टिकोन
भारतीय शेअर बाजार मार्केट कॅप स्पेक्ट्रममध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय प्रदान करतो. गेल्या पाच वर्षांत लार्ज आणि मिड कॅप कट-ऑफ जवळपास दुप्पट झाला आहे. लार्ज कॅप फंड बाजारातल्या कठीण परिस्थितीत दिलासा देतात. मिड आणि स्मॉल कॅप फंड्स अल्फा चालवण्यात मदत करतात. नावात असल्याप्रमाणे अॅक्सिस मल्टीकॅप फंड सर्व क्षेत्रात एक चांगलं आणि एकत्रित पॅकेज देतं. स्थिर आणि विचारपूर्वक गुंतवणूक अपेक्षित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उपयुक्त आहे. कमीत कमी अस्थिरतेसह दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टं ज्यांना साध्य करायची आहेत आणि ज्यांना मध्यम स्वरूपाची जोखीम घेणं शक्य आहे, त्यांनी मल्टी कॅप फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे.
अॅक्सिस मल्टीकॅप फंड (Axis Multicap Fund) बॉटम-अप स्टॉक सिलेक्शन प्रोसेसचा फायदा उठवील. त्यामध्ये प्रत्येक स्टॉकच्या अॅप्रिसिएशनच्या क्षमतेवर मौलिक दृष्टिकोनातून लक्ष केंद्रित केलं जातं. प्रत्येक मार्केट कॅपअंतर्गत सर्वश्रेष्ठ स्टॉक ओळखून वाटप पूर्ण केलं जाईल. वेगवेगळे मार्केट कॅप वेगवेगळ्या टप्प्यात काम करत असल्यामुळे मल्टीकॅप श्रेणीचे उद्देश असे आहेत. -
- सर्व मार्केट कॅप बकेटमध्ये टार्गेट लीडर्स, मोठे संघटित बाजार आणि सक्षम कंपन्यांचे शेअर्स घेणं
- रिस्क मॅनेजमेंट करून स्थिर रिटर्न्सचं उद्दिष्ट ठेवणं
- संभाव्य कंपन्यांच्या शेअर्सचं आणि सर्व तीन मार्केट कॅप्समध्ये संतुलित शेअर्सचं वाटप करणं
- फंड कंपनी स्मॉल कॅपपासून लार्ज कॅपपर्यंत प्रगतीच्या सर्व चक्रात संभाव्य संधी साधण्याची अपेक्षा ठेवते. या दृष्टिकोनातून हा फंड एका चांगल्या रिस्क-रिवॉर्ड प्रोफाइलसह गुणवत्ताकेंद्री दीर्घकालीन पोर्टफोलिओ प्राप्त करण्याचं उद्दिष्ट ठेवील.
कंपनीने काय सांगितलं?
एनएफओच्या लाँचिंगच्या पार्श्वभूमीवर अॅक्सिस एएमसीचे (Axis AMC) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंद्रेश निगम यांनी सांगितलं, 'अॅक्सिस एएमसीमध्ये आम्ही आमच्या गुंतवणूकदारांवर, तसंच बाजाराच्या बदलत्या परिस्थितीत जबाबदार राहण्यावर विश्वास ठेवतो. गुंतवणूकदारांच्या गुतंवणुकीचं केवळ रक्षण करणं एवढंच आमचं उद्दिष्ट नाही, तर त्यांना चांगला परतावा मिळवून देणं हेही उद्दिष्ट आहे. हीच रणनीती गृहीत धरून आम्ही अॅक्सिस मल्टिकॅप फंड लाँच केला आहे. हा फंड आमच्या गुंतवणूकदारांना लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप शेअर्स एकाच पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासाठी आणि अस्थिर बाजारचक्रातही कायम राहण्यासाठी मदत करील. गुणवत्ता हा आमचा पाया आहे. त्यामुळे आम्हाला बाजाराच्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत झाली आहे. आमची रणनीती दीर्घकाळ विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Axis Bank, Investment, Mutual Funds