Home /News /money /

Axis Bank च्या फिक्स डिपॉझिट व्याजदरात बदल, काय आहेत नवे व्याजदर?

Axis Bank च्या फिक्स डिपॉझिट व्याजदरात बदल, काय आहेत नवे व्याजदर?

Axis Bank व्याजदरातील हा बदल 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर आहे. 18 महिने ते 2 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या रकमेवर बँक 5.25 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, अॅक्सिस बँक 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.40 टक्के व्याज देत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 7 मार्च : देशातील खासगी बँक अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवर (Fixed Deposit) उपलब्ध व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर 18 मार्चपासून लागू होणार आहेत. अ‍ॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत विविध कालावधीसाठी एफडी ऑफर करते. मात्र मुदत ठेवी गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि फायदेशीर मानल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षांत एफडीवरील व्याजदर कमी झाले आहेत. त्यामुळे लोकांची आवड कमी झाली आहे. व्याजदरातील हा बदल 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर आहे. 18 महिने ते 2 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या रकमेवर बँक 5.25 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, अॅक्सिस बँक 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.40 टक्के व्याज देत आहे. बँक 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 5.40 टक्के व्याज देत आहे. यासोबतच 5 ते 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर 5.75 टक्के व्याजदर मिळेल. शेअर बाजार 7 महिन्यांच्या खालच्या पातळीवर, या पडझडीत तज्ज्ञांनी सुचवलेले टॉप पिक्स; चेक करा नवीन व्याजदर जाणून घ्या >> 7 -14 दिवस - 2.50 टक्के >> 15-29 दिवस - 2.50 टक्के >> 30-45 दिवस - 3.00 टक्के >> 46 ते 60 दिवस - 3.00 टक्के >> 61 दिवसांपेक्षा जास्त आणि 3 महिन्यांपेक्षा कमी - 3.00 टक्के >> 3 महिन्यांपेक्षा जास्त आणि 4 महिन्यांपेक्षा कमी - 3.50 टक्के >> 4 ते 5 महिन्यांच्या दरम्यान - 3.50 टक्के >> 5 महिने ते 6 महिने दरम्यान - 3.50 टक्के >> 6 महिने ते 7 महिने - 4.40 टक्के >> 7 महिने ते 8 महिने - 4.40 टक्के >> 8 महिने ते 9 महिने - 4.40 टक्के >> 11 महिने ते 11 महिने, 25 दिवस - 4.40 टक्के >> 11 महिने 25 दिवस ते 1 वर्ष - 4.40 टक्के >> 1 वर्ष ते 1 वर्ष 5 दिवस - 5.10 टक्के >> 1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवस - 5.15 टक्के >> 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवस - 5.25 टक्के >> 1 वर्ष 25 दिवस ते 13 महिने - 5.15 टक्के >> 13 महिने ते 14 महिने - 5.15 टक्के >> 14 महिने ते 15 महिने - 5.15 टक्के >> 15 महिने ते 16 महिने - 5.20 टक्के >> 16 महिने ते 17 महिने दरम्यान - 5.20 टक्के >> 17 महिने ते 18 महिने - 5.20 टक्के >> 18 महिने ते 2 वर्षे - 5.25 टक्के >> 2 वर्षे ते 30 महिने - 5.40 टक्के >> 30 महिने ते 3 वर्षे - 5.40 टक्के >> 3 वर्षे ते 5 वर्षे - 5.40 टक्के >> 5 वर्षे ते 10 वर्षे - 5.75 टक्के

  ATM मधून पैसे काढताना Green Light कडे लक्ष द्या, अन्यथा रिकामं होईल बँक अकाउंट

  नागरिकांसाठी अधिक व्याजदर

  अॅक्सिस बँक निवडक मुदतींवर ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याजदर ऑफर करते. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.5 टक्के ते 6.50 टक्के व्याजदर मिळेल. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank), बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि कॅनरा बँक (Canara Bank) यांनी त्यांचे एफडी व्याजदर बदलले आहेत.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Axis Bank, Fixed Deposit, Investment, Money

  पुढील बातम्या