Home /News /money /

Axis Bank बँक खातेधारकांवर बदललेल्या नियमाचा काय परिणाम होईल? नियम समजून घ्या, नुकसान टळेल

Axis Bank बँक खातेधारकांवर बदललेल्या नियमाचा काय परिणाम होईल? नियम समजून घ्या, नुकसान टळेल

अॅक्सिस बँक इझी सेव्हिंग्ज आणि अशा इतर योजनांमध्ये मासिक फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 1.5 लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत, अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना दरमहा 2 लाख रुपयांचे 4 व्यवहार मोफत देत होती.

    मुंबई, 13 एप्रिल : खासगी क्षेत्रातील बँक अॅक्सिस बँकेने (Axis Bank) अलीकडेच त्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बचत खात्यांमध्ये ठेवण्याच्या किमान रकमेची मर्यादा (Axis Bank Minimum balance Limit) बँकेने वाढवली आहे. बँकेने मोफत कॅश ट्रान्झॅक्शनची (Cash Transaction) संख्याही कमी केली आहे. बँकेचे हे नवे नियम 1 एप्रिलपासून ग्राहकांसाठीही लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो आणि मोठ्या शहरांमधील सुलभ बचत आणि अशा इतर खात्यांमध्ये किमान 12,000 रुपये ठेवावे लागतील. यापूर्वी ही रक्कम 10,000 रुपये होती. हा बदल फक्त त्या योजनांमध्ये लागू होईल, ज्यांच्या खात्यात सरासरी मासिक शिल्लक 10,000 रुपये ठेवण्याची तरतूद आहे. याचा अर्थ असा की हा नवा नियम झीरो बॅलेन्स असलेल्या खात्यांना आणि किमान शिल्लक असलेल्या इतर खात्यांना लागू होणार नाही. बँकेच्या म्हणण्यानुसार, सरासरी किमान शिल्लकमधील (Minimum Balance) नवे बदल डोमेस्टिक आणि NRI ग्राहकांना लागू आहेत. Home Loan घेण्याचा विचार करत आहात? कोणत्या बँका सर्वात स्वस्त कर्ज देत आहेत, पाहा कॅश ट्रान्झॅक्शन मर्यादा कमी अॅक्सिस बँक इझी सेव्हिंग्ज आणि अशा इतर योजनांमध्ये मासिक फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 1.5 लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत, अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना दरमहा 2 लाख रुपयांचे 4 व्यवहार मोफत देत होती. आता कोणतेही शुल्क न भरता केवळ 1.5 लाख रुपये महिन्यातून चार वेळा काढता येतील. मात्र, नॉन-होम आणि थर्ड पार्टी कॅश मर्यादेत कोणताही बदल नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. अॅक्सिस बँकेने सांगितले की, किमान शिल्लक आणि कॅश ट्रान्झॅक्शनशी संबंधित नियमांमधील हे बदल 1 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत. तुमचंही एकाच बँकेत खातं आहे का? एकच सेव्हिंग अकाऊंट नुकसादायक ठरु शकतं; कसं? जवळपास सर्व बँकांच्या बचत खातेधारकांनी त्यांच्या खात्यात किमान रक्कम ठेवणे आवश्यक आहे. जे ग्राहक किमान शिल्लक राखत नाहीत त्यांच्याकडून जवळपास सर्वच बँका दंड आकारतात. ही किमान रकमेची अट प्रत्येक बँकेत बदलते आणि सामान्यतः ठिकाण आणि खात्याच्या प्रकारावर आधारित असते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Axis Bank, Bank services

    पुढील बातम्या