'या' प्रख्यात कंपनीतील शेकडो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, फॅक्टरी बंद करण्याची मागणी

'या' प्रख्यात कंपनीतील शेकडो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, फॅक्टरी बंद करण्याची मागणी

औरंगाबादमधील बजाज कंपनीच्या प्लांटमध्ये जवळपास 250 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणं आढळून आली, अशी माहिती वाळुंज प्लांटच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 07 जुलै : काही ठिकाणी लॉकडाऊन प्रक्रिया शिथिल केल्यानंतर बजाज (Bajaj) ने त्यांच्या औरंगाबादचा कारखाना सुरू केला. यामध्ये वेगाने काम देखील सुरू झाले मात्र आता युनियनने हा प्लांट आता तात्पुरता बंद  ठेवण्याची मागणी केली आहे. या प्लांटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह जवळपास 250 प्रकरणं आढळून आली, अशी माहिती वाळुंज प्लांटच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.  त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे युनियनकडून सुरक्षेच्या दृष्टीने हा कारखाना तात्पुरता बंद करण्याची  मागणी करण्यात आली आहे.

बजाज ऑटो फॅक्टरीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे कळवले आहे की, जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना पगार मिळणार नाही. बजाज ऑटो वर्कर्स यूनियनचे अध्यक्ष थेंगडे बाजीराव यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी कामावर येण्यास घाबरत आहेत आणि काहींनी सुट्टी घेतली आहे.

10 ते 15 दिवसांसाठी प्लांट बंद करण्याची मागणी

यूनियन अध्यक्ष बाजीराव यांनी पुढे अशी माहिती दिली की, आम्ही कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 10 ते 15 दिवसांसाठी प्लांट बंद ठेवावा अशी मागणी केली आहे. मात्र कंपनीकडून त्यांना असे सांगण्यात आले की, याचा काही फायदा होणार नाही कारण काम संपल्यानंतर तसही सर्वजण सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात.

8 हजार कर्मचाऱ्यांपैकी 140 लोकांना झाला कोरोना

लोकसत्ताने Reuters च्या हवाल्याने अशी बातमी दिली आहे की, फॅक्टरीमध्ये 8 हजार कर्मचाऱ्यांपैकी 140 लोकांना कोरोना झाला आहे आणि त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की काम नाही थांबवू शकत. या विषाणूबरोबर जगणे शिकायला हवे. औरंगाबादमधील वाळुंज प्लांटमधील अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की, कोरोनाचा आकडा 250 च्या वर गेला आहे. दरम्यान बजाज कडून अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

(हे वाचा-अलर्ट! 3 वर्षांनी परतला खतरनाक Android व्हायरस, एका मेसेजमध्येच होईल खातं रिकामं)

(हे वाचा-जास्त फोनबिल भरण्यासाठी तयार राहा! कॉल आणि इंटरनेटचे दर लवकरच वाढण्याची शक्यता)

संपादन - जान्हवी भाटकर

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 7, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या