>>सेट अप प्लॅन
प्रत्येक उत्पादनाची वैशिष्ट्ये वेगवेगळी 'फ्लेक्सी प्लस लोन्स' च्या शुभारंभ प्रसंगी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे एमडी सरोश अमरिया यांनी सांगितले, टाटा कॅपिटलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होण्याजोगी, किफायतशीर व सुविधाजनक आर्थिक उत्पादने सादर करून ग्राहकांना अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. 'फ्लेक्सी प्लस लोन्स' या आमच्या नव्या सुविधेमध्ये अधिक जास्त लवचिक लाभांचा समावेश करण्यात आला आहे, ग्राहकांना आपल्या आर्थिक गरजांनुसार कर्ज सुविधांचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध करवून देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. आमच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर आमच्या उत्पादनांचा लाभ अगदी पटकन आणि सहजपणे घेता येऊ शकतो. 'फ्लेक्सी प्लस लोन्स' च्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना अधिक जास्त सेवासुविधा आणि मूल्य प्रदान करण्याचे आमचे उद्धिष्ट आहे. 'फ्लेक्सी प्लस लोन्स' ची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या सुविधांचे लाभ घेता यावेत यासाठी एक विशेष एकात्मिक मार्केटिंग कॅम्पेन - 'इंडिया - अपने मन की करो' सुरु करण्यात येणार आहे. या कॅम्पेनमध्ये 3 विनोदी शॉर्ट फिल्म्स आहेत ज्यामध्ये नवीन उत्पादनांची ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यात आली आहेत.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Loan, Tata group