मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ATM मधून पैसे काढण्यासह करा 'ही' कामं; एफडी ते बिल पेमेंटसह मिळतात अनेक सुविधा

ATM मधून पैसे काढण्यासह करा 'ही' कामं; एफडी ते बिल पेमेंटसह मिळतात अनेक सुविधा

सर्वात आधी करा 'हे' काम

सर्वात आधी करा 'हे' काम

एटीएमच्या मदतीने तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. मात्र, यासाठी ऑनलाइन किंवा शाखेत जाऊन ज्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करायची आहे त्या खात्याची नोंदणी करावी लागेल.

    मुंबई, 1 ऑगस्ट : एटीएममधून पैसे काढणे आजकाल प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र तुम्ही पैसे काढण्याव्यतिरिक्त इतर अनेक सेवांसाठी एटीएम वापरू शकता. बँक एफडीपासून ते टॅक्स डिपॉझिटपर्यंत अनेक कामे आता एटीएममध्ये करता येतील. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. कॅश ट्रान्सफर एटीएमच्या मदतीने तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. मात्र, यासाठी ऑनलाइन किंवा शाखेत जाऊन ज्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करायची आहे त्या खात्याची नोंदणी करावी लागेल. एटीएममधून एकावेळी 40,000 रुपये ट्रान्सफर करता येतात. एका दिवसात अनेक व्यवहार केले जाऊ शकतात. एशिया नेट न्यूज वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कॅश डिपॉझिट सुविधा देशातील जवळपास सर्व बँकांनी त्यांच्या एटीएमसह कॅश डिपॉझिट मशीन्स बसवल्या आहेत. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसेही जमा करू शकता. मात्र मशीनद्वारे एकावेळी केवळ 49,900 रुपयेच जमा करता येणार आहेत. 2000, 500, 100 आणि 50 रुपयांच्या नोटा मशिनमध्ये जमा करता येतील. LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त; चेक करा किती रुपये कपात करण्यात आली? विमा पॉलिसीचा प्रीमियम विमा पॉलिसीचा प्रीमियम एटीएमद्वारे देखील जमा केला जाऊ शकतो. बँकांनी यासाठी एलआयसी, एचडीएफसी लाईफ आणि एसबीआय लाइफ यांसारख्या विमा कंपन्यांशी करार केला आहे. या तिन्ही कंपन्यांचे ग्राहक एटीएममधून पैसे भरू शकतात. एटीएम स्क्रीनवर, बिल-पे विभागात जा, विमा कंपनीचे नाव निवडा, पॉलिसी क्रमांक प्रविष्ट करा. यानंतर बर्थ डेट आणि मोबाइल नंबर यांसारखे तुमचे तपशील प्रविष्ट करा. प्रीमियम रक्कम एंटर करून व्हेरिफिकेशन करा. तुमच्या विमा पॉलिसीचे पैसे भरले जातील. ATM वरून पर्सनल लोनसाठी अर्ज तुम्ही एटीएममधूनही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला फोन बँकिंग किंवा शाखेत जाण्याची गरज नाही. अनेक खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांना एटीएमद्वारे प्री अप्रुव्ह वैयक्तिक कर्ज देतात. एटीएममधून पैसे काढता येतात. यासाठी ग्राहकाचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स, खात्यातील शिल्लक, पगाराची रक्कम आणि क्रेडिट/डेबिट कार्ड परतफेड डिटेल्स पाहिल्या जातात. कर भरणा तुम्ही तुमच्या एटीएम कार्डद्वारेही आयकर भरू शकता. आतापर्यंत हे आयकर विभागाच्या वेबसाइटवरून किंवा थर्ड पार्टीच्या वेबसाइटवरून केले जात होते, परंतु आता ही सुविधा एटीएममध्येही उपलब्ध आहे. अॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट, रेग्युलर असेसमेंट नंतर भरलेला कर समाविष्ट आहे. मात्र प्रथम आपल्याला वेबसाइट किंवा शाखेत आपली नोंदणी करावी लागेल. यानंतरच एटीएममधून कर भरता येईल. खात्यातून पैसे कापल्यानंतर CIN क्रमांक जारी केला जाईल. कर जमा केल्यानंतर 24 तासांनी बँकेच्या वेबसाइटवरून CIN द्वारे चलन प्रिंट केले जाऊ शकते. Changes from 1 August : आजपासून कोणते नियम बदलणार? तुमच्यावर काय परिणाम होईल? चेक करा एटीएमद्वारे एफडी एटीएमद्वारे एफडी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. आतापर्यंत फिक्स डिपॉझिट फक्त बँकेच्या शाखेत उपलब्ध होते, परंतु एटीएमद्वारे तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मेन्यूमधून एफडी पर्याय निवडून तुमची एफडी उघडू शकता. यामध्ये डिपॉझिटचा कालावधी, एफडी किती रक्कम उघडायची याचा पर्यायही उपलब्ध असेल. बिल पे एटीएममधून टेलिफोन, वीज, गॅस किंवा इतर अनेक बिले भरता येतात. बिल भरण्यापूर्वी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर एकदा स्वतःची नोंदणी करावी लागेल. मोबाईल रिचार्ज तुम्ही तुमच्या शेजारच्या ATM ला भेट देऊन तुमचे प्रीपेड मोबाईल कनेक्शन रिचार्ज करू शकता. चेक बुक रिक्वेस्ट तुम्हाला चेकबुक हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. तुम्ही एसबीआय एटीएमला भेट देऊन नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकता आणि त्यानंतर चेकबुक तुमच्या बँकेत नोंदणीकृत पत्त्यावर वितरित केले जाईल. देणगी देऊ शकता तुम्हाला कोणत्याही मंदिरात किंवा धर्मादाय संस्थेला देणगी द्यायची असेल तर हे कामही SBI ATM द्वारे केले जाते. SBI ATM तुम्हाला वैष्णो देवी, शिर्डी साईबाबा, गुरुद्वारा तख्त साहेब (नांदेड), तिरुपती, श्री जगन्नाथ (पुरी), पलानी (तामिळनाडू), रामकृष्ण मिशन (कोलकाता), काशी विश्वनाथ (बनारस), तुळजा भवानी आणि महालक्ष्मी यांसारख्या देवस्थानांना देणगी देण्याची सेवा देईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: ATM, Money

    पुढील बातम्या