तुमची होतेय फसवणूक! ATM मधून पैसे काढण्यापूर्वी 'हा' VIDEO पाहाच

तुमची होतेय फसवणूक! ATM मधून पैसे काढण्यापूर्वी 'हा' VIDEO पाहाच

ATM वापरताना खबरदारी घेतली नाहीत तर तुमच्या बँक खात्यावरची रक्कम फ्रॉड करणारे काढून घेऊ शकतात.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : बँकेत रांगा लावून पैसे काढण्याचा त्रास वाचावा म्हणून एटीएम, नेट बँकिंगसारख्या सुविधा आल्या. या सुविधांमुळं आपलं काम जितकं सोपं केलं तितकंच धोकादायकही झालं आहे. एटीएममधून पैसे काढताना थोडी जरी चूक झाली तरी तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. एटीएम मशिनच्या मदतीनं गंडा घालणारे कशा प्रकारे फसवणूक करतात याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी हा विडिओ शेअर केला आङे.

एटीएम वापरणाऱ्यांनी सावधानता बाळगावी यासाठी विजय शेखर यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. यात तुमच्या एटीएम कार्डचं कशा प्रकारे क्लोनिंग होऊ शकतं हे दिसत आहे. लोकांना एटीएम कार्डचं स्किमिंग कसं होतं हे माहिती नसतं. त्यामुळं आपल्या कार्डची माहिती चोरली जात आहे याची पुसटशी कल्पनाही येत नाही. त्यामुळं कार्डच्या डिटेल्स आणि पिन नंबर चोरी होतो.

कोणत्याही एटीएममधून पैसे काढताना मशिनच्या किबोर्डबाबत थोडा जरी संशय आला तरी त्याचा वापर करू नका. याबाबतची माहिती पोलिस आणि बँकेला द्या. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसेल तिथल्या एटीएम मशिनमधून पैसे काढणं टाळावं.

फसवणूक करणारे एटीएम मशिन किंवा POS टर्मिनल्सच्या कार्ड स्लॉटवर एक लहान मशिन लावलं जातं. त्यामध्ये एटीएम कार्डच्या स्ट्रीपवरची सर्व माहिती कॅप्चर केली जाते. तर लपवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात तुम्ही टाकलेला पिन नंबर त्यांना समजतो. त्यानंतर कार्डचं क्लोनिंग करून दुसरं एटीएम तयार केलं जातं आणि पैसे काढले जातात.

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 01:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading