ATM मधून फक्त पैसे नाहीत तर 'या' 8 सेवाही मोफत मिळतात

ATM मधून फक्त पैसे नाहीत तर 'या' 8 सेवाही मोफत मिळतात

ATM, Bank - एटीएममध्ये पैसे काढण्याव्यतिरिक्त बऱ्याच सुविधा मिळतात. कुठल्या ते घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : तुम्ही तुमच्या बँकेच्या ATMचा उपयोग पैसे काढण्यासाठी किंवा अकाउंट बॅलन्स चेक करण्यासाठी करत असाल. पण तुम्हाला हे माहितीय का की एटीएममध्ये तुम्ही बरंच काही काम करू शकता, बँकेच्या एफडीपासून ते मोबाइल रिचार्जपर्यंत तुम्ही बँकेत न जाता सर्व कामं करू शकता. जाणून घेऊया त्याबद्दल -

1. फिक्स्ड डिपाॅझिटची सोय - तुम्ही ATMद्वारे फिक्स्ड डिपाॅझिट करू शकता. तुम्हाला मेन्यूत सांगितलेल्या स्टेप्स फाॅलो कराव्या लागतील. यात तुम्हाला डिपाॅझिटचा अवधी, रक्कम निवडल्यानंतर कन्फर्म करण्याचा पर्याय निवडावा लागेल.

2. कर भरणं - देशातल्या अनेक मोठ्या बातम्या एटीएमद्वारे कर भरण्याची सुविधा देतायत. यात अॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट टॅक्स आणि रेग्युलर असेसमेंटनंतर भरावा लागणारा कर यांचा समावेश आहे. ATM द्वारे तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा असेल तर तुम्हाला बँकेच्या वेबसाइट किंवा ब्रँचमध्ये पहिल्यांदा या सेवेसाठी रजिस्टर करणं आवश्यक आहे.

90 दिवसाचं मूल ते 65 वर्षाच्या व्यक्तीसाठी आहे 'ही' LIC पाॅलिसी

अकाउंटवरून पैसे कापले गेल्यानंतर एटीएम तुम्हाला एक सीआयएन नंबर देईल. त्यानंतर 24 तासानंतर तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर जाऊन सीआयएन नंबराचा उपयोग करून चलन प्रिंट घेऊ शकता.

3. एटीएममध्ये पैसे जमा करू शकता - अनेक मोठ्या  सरकारी आणि खासगी बँकांनी कॅश डिपाॅझिट मशीन लावलीय. त्यात तुम्ही 49,900 रुपये जमा करू शकता. या मशीनमध्ये 2000, 500, 100 आणि 50 रुपयांच्या नोटा जमा करता येतात.

दररोज दर 5 पैकी 1 भारतीय उदासीनतेसह जगतो, जाणून घ्या काय आहे कारण

4. विमा पाॅलिसी भरू शकता - LIC, HDFC लाइफ आणि SBI सारख्या विमा कंपन्यांनी बँकांशी करार केलाय. त्यामुळे ग्राहक एटीएमद्वारे प्रीमियम भरू शकतात. ती पद्धत सहज आहे. एटीएमच्या बिल पे सेक्शनमध्ये विमा कंपनीचं नाव निवडा. त्यानंतर पाॅलिसी नंबर एंटर करून त्यात वाढदिवस आणि मोबाइल नंबर टाका. त्यानंतर त्यात प्रीमियमची रक्कम भरा आणिि कन्फर्म करा.

5. कर्जासाठी अर्ज करा - छोट्या रकमेचं पर्सनल लोन तुम्ही एटीएमद्वारे घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. अनेक खासगी बँका ATMद्वारे ग्राहकांना प्री अॅप्रुव्ड कर्ज देतात.

6. कॅश ट्रान्सफर - तुम्ही नेटबँकिंगचा प्रयोग करत नसाल तर ATMच्या मदतीनंही तुम्ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करू शकता. तुम्ही 40 हजार रुपयापर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता. एका दिवसात अनेकदा पैसे ट्रान्सफर करू शकता.

अजित पवार महाराष्ट्रात राबवणार 'राज ठाकरे पॅटर्न', सोलापुरात केली 'ही' घोषणा

7. बिल भरू शकता - एटीएमद्वारे तुम्ही टेलिफोन, वीज, गॅस किंवा दुसरी बिलं भरू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर रजिस्टर करावं लागेल.

8. ट्रेनचं तिकीट बुक - SBI नं ही सेवा अनेक ATM द्वारे दिलीय. ही सेवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या आरक्षित तिकिटांसाठी आहे.

3 तासांनंतर 117 प्रवाशांना महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून बाहेर काढलं; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Published by: Sonali Deshpande
First published: July 27, 2019, 12:48 PM IST
Tags: ATMbank

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading