Home /News /money /

विमान प्रवास महागण्याची शक्यता, जानेवारीत दुसऱ्यांदा वाढले Aviation Turbine Fuel चे भाव

विमान प्रवास महागण्याची शक्यता, जानेवारीत दुसऱ्यांदा वाढले Aviation Turbine Fuel चे भाव

जानेवारी 2022 मधील एटीएफच्या किमतीतील ही दुसरी वाढ आहे. याआधी 1 जानेवारी रोजी विमान इंधनाच्या किमतीत 2,039.63 रुपये प्रति किलोलीटर किंवा 2.75 टक्क्यांनी वाढ झाली होती आणि ती 76,062.04 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचली होती.

    मुंबई, 16 जानेवारी : विमानाने प्रवास करणे आता महाग होऊ शकते. कारण विमानाचे इंधन म्हणजेच एटीएफ (Aviation Turbine Fuel) 4.2 टक्क्यांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना या महिन्यात दुसऱ्यांदा एटीएफच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार, दिल्लीतील एटीएफच्या किमती 3,232.87 रुपये प्रति किलोलीटर किंवा 4.25 टक्क्यांनी वाढून 79,294.91 रुपये प्रति किलोलीटर झाल्या आहेत. जानेवारीत एटीएफच्या दरात दुसरी वाढ जानेवारी 2022 मधील एटीएफच्या किमतीतील ही दुसरी वाढ आहे. याआधी 1 जानेवारी रोजी विमान इंधनाच्या किमतीत 2,039.63 रुपये प्रति किलोलीटर किंवा 2.75 टक्क्यांनी वाढ झाली होती आणि ती 76,062.04 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचली होती. त्याच वेळी, डिसेंबरमध्ये दोनदा एटीएफच्या किमतीत कपात करण्यात आली. नोव्हेंबरच्या मध्यात जेट इंधन 80,835.04 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचले. 15 डिसेंबर रोजी एटीएफच्या किमतींमध्ये एकूण 6,812.25 रुपये प्रति किलोलीटर किंवा 8.4 टक्क्यांनी कपात करण्यात आली. जेट इंधनाचे दर महिन्याला दोनदा सुधारले जातात जेट इंधनाच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला सुधारित केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात, परंतु 4 नोव्हेंबर 2021 पासून वाहनांच्या इंधनाच्या किमती बदललेल्या नाहीत. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांनी कपात केली होती. मात्र, या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत बरीच अस्थिरता निर्माण झाली आहे. ब्रेंट क्रूड तेल 5 नोव्हेंबर 2021 रोजी प्रति बॅरल $82.74 वर होते. 1 डिसेंबर रोजी ते प्रति बॅरल $ 68.87 पर्यंत खाली आले. तेव्हापासून त्याच्या किंमती वाढत आहेत आणि ते प्रति बॅरल $ 85 पर्यंत पोहोचले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Airplane, Petrol and diesel

    पुढील बातम्या