नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी आपले बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असायला हवे. या योजनेमध्ये ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.
अटल पेन्शन योजना काय आहे?
तुम्ही अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana APY) केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत किमान मासिक पेन्शन 1,000, 2000, 3000, 4000 आणि कमाल 5,000 रुपये मिळू शकते. जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
असे फायदे मिळवा
तुम्ही जितक्या लवकर अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करायला लागाल, तितके अधिक फायदे तुम्हाला मिळतील. जर एखादी व्यक्ती 18 वर्षांच्या वयात अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू लागली, तर त्याला 60 वर्षांच्या वयानंतर प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळू लागते. विशेष म्हणज यासाठी तुम्हाला फक्त दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.
हे वाचा - वहिनीनं साखरपुड्यात दिरांसोबत लगावले ठुमके; जबरदस्त Dance Video चा इंटरनेटवर धुमाकूळ
अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 10,000 रुपये मिळतील
जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करू लागली तर वयाच्या 60 वर्षांनंतर त्याला दरमहा 5,000 रुपये मासिक पेन्शनसाठी फक्त 210 रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर 39 वर्षापेक्षा कमी वयाचे पती -पत्नी या योजनेत वेगवेगळे 420 रुपये जमा करून वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये पेन्शन मिळवू शकतात.
गणित काय आहे ते जाणून घ्या
या योजनेमध्ये दरमहा 1000 रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा फक्त 42 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे, 2000 रुपयांच्या पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपये मासिक पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील.
हे वाचा - LPG Cylinder Subsidy: पुन्हा मिळू शकेल LPG सिलेंडरवर सब्सिडी, सरकारचा मास्टर प्लॅन
कर लाभ
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना प्राप्तिकर कायदा 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभ मिळतो. यातून ग्राहकांचे करपात्र उत्पन्न कापले जाते. या व्यतिरिक्त, विशेष प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. अशा प्रकारे, या योजनेमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची कपात उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pension, Pension scheme