प्राध्यापकांसाठी रयत शिक्षण संस्थेत मोठी संधी, 'या' उमेदवारांना पसंती

प्राध्यापकांसाठी रयत शिक्षण संस्थेत मोठी संधी, 'या' उमेदवारांना पसंती

Rayat Shikshan Sanstha, Assistant Professor - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919मध्ये रयत शिक्षण संस्था सुरू केली. त्या संस्थेत प्राध्यापकांची भरती सुरू केलीय

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919मध्ये रयत शिक्षण संस्था सुरू केली. त्या संस्थेत प्राध्यापकांची भरती सुरू केलीय. रयत शिक्षण संस्थेत 725 सहाय्यक पदासाठी व्हेकन्सी आहे. याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे -

पद - सहाय्यक प्राध्यापक

एकूण जागा - 725

गृहकर्जाचं टेन्शन नको, LIC नं आणलीय ही नवी योजना

शैक्षणिक पात्रता -  M.CM.S./ M.Sc.Com/ M.A./ M.E./ M.A./ M.Com/ LLM/SET/NET/Ph.D/ पदवी/ पदव्युत्तर पदवी

नोकरीचं ठिकाण - या पदांसाठी पोस्टिंग सातारा आणि कोल्हापूर इथे होईल.

अर्जाची फी 80 रुपये आहे.

CRPF मध्ये डाॅक्टर पदासाठी 92 जागा, 'असा' करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2019

मुलाखत 15, 16, 17 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून

मुलाखतीचं ठिकाण - धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा, महाराष्ट्र

आॅनलाइन अर्ज http://rayat.erecruitment.co.in/StaticPages/Homepage.aspx इथे करा.

10वी पास असलेल्यांना ड्रायव्हरची संधी, 'या' उमेदवारांची होईल निवड

तसंच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत चांगली संधी आहे. सहाय्यक शिक्षक या पदावर नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी 78 जागा आहेत. त्यात मराठी माध्यमासाठी 60 आणि उर्दू माध्यमासाठी 18 जागा आहेत. तुम्ही https://www.pcmcindia.gov.in/marathi/ इथे अधिक माहिती मिळवू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 जुलै.

दरम्यान, नागपूर विद्यापीठातही 117 असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी अर्ज मागवलेत. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै. या पदांवर उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू घेऊन केली जाईल. कुठलीही लिखित परीक्षा घेतली जाणार नाही.

असिस्टंट प्रोफेसर पदांवर अर्जासाठी 55 टक्के आणि मास्टर डिगरी हवी. उमेदवारानं नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) उत्तीर्ण असायला हवी.

असिस्टंट प्रोफेसर पदांवर इंटरव्ह्यूच्या आधारे निवड होईल. यासाठी उमेदवाराला परीक्षा द्यायची गरज नाही. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://www.nagpuruniversity.org/rtmnu/home/ यावर क्लिक करा. उमेदवार 15 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात.

VIRAL VIDEO : रिफाइंड तेलाचा टँकर उलटला, तेलासाठी ग्रामस्थांची उडाली झुंबड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 08:21 PM IST

ताज्या बातम्या