मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Assembly Election: पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षांनी किती पैसा खर्च केला? वाचा डिटेल्स

Assembly Election: पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षांनी किती पैसा खर्च केला? वाचा डिटेल्स

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीच्या हालचालींवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने 2017 मध्ये जारी केलेल्या अहवालात म्हटले होते की, देशातील 7 राष्ट्रीय आणि 16 प्रादेशिक पक्षांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा येथे एकूण 494.36 कोटी रुपये खर्च केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 10 मार्च : निवडणूक लोकसभा असो की राज्यांच्या विधानसभेची, ती जिंकण्यासाठी सर्वच पक्ष पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरू असताना, या निवडणुकीवर एकूण किती खर्च झाला असेल, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीच्या हालचालींवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने 2017 मध्ये जारी केलेल्या अहवालात म्हटले होते की, देशातील 7 राष्ट्रीय आणि 16 प्रादेशिक पक्षांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा येथे एकूण 494.36 कोटी रुपये खर्च केले आहेत. यंदाच्या म्हणजे 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी आयोगाने 10 टक्के जास्त रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली आहे. हे प्रमाण बघितले तर यावेळी 550 कोटींहून अधिक खर्च झाल्याचा अंदाज आहे. मात्र एडीआरने 2022 मधील निवडणूक खर्चाचा अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. UP Election Result: उत्तरप्रदेशात बसपाचा दारूण पराभव, मतमोजणी दरम्यान BSP पोलिंग एजंटला Heart Attack यूपीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पैसा खर्च यूपी या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यात पक्षांनी अपेक्षेपेक्षा जास्त पैसा निवडणुकीत खर्च केला आहे. निवडणुकीच्या वेळी जप्त करण्यात आलेल्या पैशात त्याचा प्रत्यय येतो. 3 मार्च 2022 पर्यंत यूपीमध्ये एकूण 328.33 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, जे 2017 च्या निवडणुकीत केवळ 193.29 कोटी होते. एवढी मोठी रक्कम जप्त केली असेल, तर किती खर्च झाला असेल, याचा अंदाज सहज बांधता येतो. 4 हजार कोटी रुपये फक्त यूपीमध्ये खर्च होऊ शकतात एका अंदाजानुसार, यावेळी एकट्या यूपीच्या विधानसभा निवडणुकीत 4 हजार कोटींहून अधिक खर्च झाल असण्याचा अंदाज आहे. अधिकृत आकडेवारीत वेगळा आकडा असला तरी वस्तुस्थिती याच्या पलीकडे आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर, CMS सर्वेक्षण अभ्यासात एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 5,500 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे. UP Election Result 2022: योगी आदित्यनाथांचा मोठा रेकॉर्ड, आजपर्यंत करु शकलं नाही कोणताच मुख्यमंत्री 2019 च्या लोकसभा निवडणुकीत किती खर्च झाला? एका अंदाजानुसार, गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी मिळून सुमारे 60 हजार कोटी रुपये खर्च केले होते. मात्र एडीआरची अधिकृत आकडेवारी यापेक्षा खूपच कमी होती. असे असतानाही विविध अशासकीय अहवालांमध्ये 60 हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता.
First published:

Tags: Assembly Election, Yogi Aadityanath

पुढील बातम्या