नव्या नवरीला सरकारतर्फे एक तोळा सोनं फुकट; या राज्याने केली घोषणा, सॅनिटरी नॅपकिन्सविषयीही मोठा निर्णय

नव्या नवरीला सरकारतर्फे एक तोळा सोनं फुकट; या राज्याने केली घोषणा, सॅनिटरी नॅपकिन्सविषयीही मोठा निर्णय

या राज्याने एक तोळा योजनेबरोबर सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराविषयीसुद्धा एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

गुवाहाटी, 20 नोव्हेंबर : राज्यातले बालविवाह रोखण्यासाठी आणि स्त्रीभृणहत्येला लगाम मिळावा यासाठी आसाम सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अरुंधती योजना नावाने आसामच्या सर्वानंद सोनवाल सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत नव्या नवरीला एक तोळा सोनं सरकारतर्फे देण्यात येणार आहे. आसामची राजधानी गुवाहाटी इथे खुद्द मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी या योजनेला हिरवा कंदील दाखवला. ही योजना राज्याच्या बजेटमध्येच समाविष्ट केलेली होती. ती आता प्रत्यक्षात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या घरातल्या नवऱ्या मुलीलाच या योजनेचा फायदा मिळणार आहे.

एक तोळा सोनं देणाऱ्या या अरुंधती योजनेचा Arundhati Scheme मुख्य उद्देश बालविवाहांची संख्या कमी करणं हा आहे. 18 वर्षांखालील मुलींचे विवाह आसामात सर्रास होतात. त्यावर लगाम घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

वाचा - चक्क सापासोबत दोरी उड्या, लहान मुलांचा भयानक VIRAL VIDEO

कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांहून कमी असेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.

सॅनिटरी नॅपकिन्सबाबत मोठा निर्णय

आसाम सरकारने महिलांच्या आरोग्याविषयी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी, बिगर सरकारी कार्यालयांमध्ये आणि खासगी उद्योगांनीदेखील सॅनिटरी नॅपकिन्स ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल बिन ठेवणंही अनिवार्य करण्यात येणार आहे. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावता यावा यासाठी अशा पद्धतीने कलेक्शन बिन्स ठेवण्याचा आग्रह सरकारने धरला आहे. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंपन्यांवर सोपवण्यात आली आहे.

-----------------

अन्य बातम्या

दिग्दर्शक सुजॉय घोषने Twitter वर लीक केली कहानी 3 ची स्टोरी

सेम टू सेम '3 इडियट्स'.. भररस्त्यावर गाडीत केली महिलेची डिलिव्हरी!

असा ही अवलिया; 16 वर्षात सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर, एकही फ्लॉप नाही!

शरद पवार आणि PM मोदी यांच्या भेटीवर सोनिया गांधी नाराज!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: assamgold
First Published: Nov 20, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या