मराठी बातम्या /बातम्या /मनी /आपले स्वप्नातले घर बांधणाऱ्या सेलिब्रिटीजच्या प्रेरक कथा पहा

आपले स्वप्नातले घर बांधणाऱ्या सेलिब्रिटीजच्या प्रेरक कथा पहा

‘Asian Paints’ पुन्हा घेऊन येत आहे ‘Where The Heart Is’(व्हेअर द हार्ट इज)चे चौथे पर्व जे दाखवेल याआधी कधीही न पाहिलेली सेलिब्रिटीजची घरे. या सेलिब्रिटीजनी आपली स्वप्नातली घरे कशी बांधली हे कळल्यावर आपण मंत्रमुग्ध व्हाल.

‘Asian Paints’ पुन्हा घेऊन येत आहे ‘Where The Heart Is’(व्हेअर द हार्ट इज)चे चौथे पर्व जे दाखवेल याआधी कधीही न पाहिलेली सेलिब्रिटीजची घरे. या सेलिब्रिटीजनी आपली स्वप्नातली घरे कशी बांधली हे कळल्यावर आपण मंत्रमुग्ध व्हाल.

‘Asian Paints’ पुन्हा घेऊन येत आहे ‘Where The Heart Is’(व्हेअर द हार्ट इज)चे चौथे पर्व जे दाखवेल याआधी कधीही न पाहिलेली सेलिब्रिटीजची घरे. या सेलिब्रिटीजनी आपली स्वप्नातली घरे कशी बांधली हे कळल्यावर आपण मंत्रमुग्ध व्हाल.

  यामध्ये आहेत काही सुंदर घरे जी आपल्याला आपल्या आजूबाजूला एक नवीन बदल आणण्यासाठी प्रेरणा देईल. देशात बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा टाळेबंदीसारखेच निर्बंध लागू

  झालेले असताना आपल्या घरामध्ये काही चांगले बदल आणण्यासाठी काही सुंदर घरे पाहून त्यातून काही प्रेरणा घेता आली तर यापेक्षा चांगले काय असू शकेल.

  ‘Asian Paints’च्या ‘Where The Heart Is’(व्हेअर द हार्ट इज) या कार्यक्रमामध्ये काही सेलिब्रिटीज त्यांच्या घरातील सर्वोत्तम जागा, सौंदर्य, रंग आणि त्याचे स्वप्नातील घर साकार होण्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी करण्यासाठी सोप्या सूचना देतात. आता या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वामध्ये ही हृदयस्पर्शी मालिका का पहावी हे जाणून घ्या

  राजकुमार राव:

  अर्दी टोन्स व आकर्षक रंगसंगतीचे अचूक मिश्रण असलेले, अभिनेता राजकुमारच्या घरामध्ये विविध उर्जा आणि नैसर्गिक उजेडाचे संतुलन साधले आहे जेणेकरून एखादा दिवसभरातील कामकाजाची व्यस्तता आटोपून आल्यावर तेथे त्याला शांतता मिळेल.

  तमन्ना भाटीया:

  म्युटेड कलर्स, टेक्स्चर्ड वॉल्स आणि फरशांमुळे तमन्ना भाटीयाचे घर हे सौंदर्य आणि साधेपणाचा तसेच तिच्या ग्लॅमरस भूमिकेपेक्षा वेगळा असा एक नमुनाच आहे. या घरातील बारकावे आणि सौंदर्यस्थळे ही कोणालाही आणि प्रत्येकाला अचंबित करतात.

  अनिता डोंगरे:

  भरपूर नैसर्गिक प्रकाश, हिरवी गार बाग आणि किमान पण आकर्षक सजावट असलेल्या अनिता डोंगरे यांच्या घरी शांतता आणि स्थैर्य ओसंडून वाहते. तरीही या फॅशनच्या दुनियेतील आयकॉन असलेल्या अनिताचा प्रशस्त बंगला म्हणजे अंतर्बाह्य एक कलाकृतीच आहे.

   शंकर महादेवन:

  शंकर महादेवनचे दुसरे घर हे एका खेड्यात एका वाहत्या ओढ्याच्या काठी आहे. ही वस्तू तिच्या उंच छत, विविध प्रकारची रंगसंगती यांनी सजलेले आहे आणि दोन आकर्षक कुत्रे या जागेला महादेवनच्या गाण्याइतकेच अनोखे रूप देतात.

  स्मृती मानधना:

  भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे घर हे म्युटेड कलर्स, टेक्स्चर्ड वॉल्स यांची अभिरुचीपूर्ण सजावट केलेले आहे, आणि त्यातील सरळ रेषा कानाकोपऱ्यातील साधेपणा आणि प्रसन्नता प्रदर्शित करतात. तिच्या खेळ आणि कौटुंबिक आयुष्याचा अचूक समतोल राखत तिचे घर आठवणी आणि यशाचा एक मिलाफ प्रदर्शित करते आणि हे पाहणे अत्यंत रोमांचक आहे.

  शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन:

  त्याच्या घराच्या टेरेसपासून ते नृत्याच्या सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या भव्य हॉल आणि त्यांच्या व्यक्तिगत खोल्यांपर्यंत शक्ती आणि मुक्ती मोहन या झगमगत्या जोडीचे घर हे व्यक्तीनिष्ठ आणि या जोदीतकेच खास असल्याचे जाणवते. आकर्षक रंग आणि अर्दी टोन्सने रंगलेले हे घर त्यांच्या झगमगत्या कामगिरीशी अगदी कमालीचा विरोधाभास दर्शवते.

  " isDesktop="true" id="546092" >

  कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आपण पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्याच घरात कैद झालेलो असताना ही मालिका पाहणे म्हणजे सेलिब्रिटी असो व नसो पण आपल्यापैकी प्रत्येकाचे घर किती शांत आणि सुंदर असू शकेल याची आठवण करणे आहे.

  तर, ‘Where The Heart Is’(व्हेअर द हार्ट इज) चे संपूर्ण पर्व येथे पहा

  First published:
  top videos