नवी दिल्ली, 24 जून: गेल्या काही काळापासून ऑनलाइन पेमेंट (Online Payment), इतर ऑनलाइन व्यवहारांचे (Online Transaction) प्रमाण वाढले आहे. विविध प्रकारची बिलं देखील ऑनलाइन भरली जातात. वीजबिल, गॅस बिल, मोबाइल रिचार्ज असे पेमेंट्स ऑनलाइन केले जातात. इंटरनेट बँकिंगच्या (Internet Banking) साहाय्याने देखील हे पेमेंट करण्यात येतात. मात्र जेवढे ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत, तेवढीच जोखीमही वाढली आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारीही बाळगणं आवश्यक आहे. शिवाय एखादी समस्या उद्भवल्यास ती कशी सोडवायची हे देखील माहित असणं आवश्यक आहे.
अनेकदा अशी समस्या येते की जरी तुम्ही ऑनलाइन पैसे पाठवले, तरी ते समोरच्या व्यक्तीला मिळत नाहीत. मात्र ते तुमच्या खात्यातून डेबिट होतात. तुमचं खातं जर एसबीआयमध्ये (State Bank of India SBI) असेल तर अशाप्रकारे समस्येला तोंड देण्यासाठी एक विशेष प्रक्रिया आहे. तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. तुमच्या ट्रान्झॅक्शनबाबत योग्य माहिती मिळवू शकता. एसबीआय वेळोवेळी बँकिंग अपडेट बँकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करत असते. ऑनलाइन ट्रान्झॅक्शनबाबतच्या समस्येवरही एसबीआयने ट्वीट केलं आहे. एका बँक ग्राहकाच्या तक्रारीला उत्तर देताना बँकेकडून ट्वीट करण्यात आलं आहे.
हे वाचा-ही सरकारी बँक आज देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी, वाचा कशाप्रकारे कराल अर्ज?
ग्राहकाच्या तक्रारीवर SBI चं उत्तर
एका ग्राहकाने एसबीआयच्या ट्विटर हँडलला टॅग करत अशी तक्रार केली आहे की त्यांनी वीजबिल फोनपेच्या माध्यमातून ऑनलाइन भरलं होतं, पैसेही डेबिट झाले मात्र बिल बोर्डाला पैसे मिळाले नाहीत. एसबीआयने यावर उत्तर देत यावेळी ग्राहकाने काय केलं पाहिजे याची माहिती दिली आहे.
हे वाचा-Gold Price: खूशखबर! सोन्याचांदीची झळाळी उतरली, खरेदीआधी इथे तपासा लेटेस्ट दर
एसबीआयने दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, 'तुम्हाला झालेल्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्राथमिक स्टेप म्हणून तुम्ही App मध्ये ही समस्या आल्याचं नमुद करा आणि तरी देखील समस्या आल्यास सर्व तपशील (अमाउंट, 12 अंकी ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर, व्यवहाराची तारीख) support.upi@sbi.co.in यावर मेल करणं हे पुढचं पाऊल असेल.'
We sincerely regret the inconvenience caused to you. As the primary step, please raise a dispute within the App and if the issue remains unresolved then the next step would be to mail the details (amount, 12 digit txn ref no. and date of txn) to support.upi@sbi.co.in, (1/2)
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 23, 2021
SBI कडून ग्राहकांना विविध सेवा ऑनलाइन पुरवल्या जातात. डिजिटल पेमेंट, ऑनलाइन व्यवहार यामध्ये ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांचा बँकिंग अनुभव चांगला राहावा याकरता बँकेकडून वेळोवेळी अपग्रेडेशन आणि मेंटेनन्सचं काम केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online payments, Online shopping, SBI, SBI bank