मराठी बातम्या /बातम्या /मनी /

होम लोनसाठी अर्ज करताय? जाणून घ्या, आवश्यक कागदपत्रं आणि प्रक्रिया

होम लोनसाठी अर्ज करताय? जाणून घ्या, आवश्यक कागदपत्रं आणि प्रक्रिया

होम लोन

होम लोन

आपली स्वतःची मालकी असलेलं हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. आयुष्यात घर खरेदी करणं, हा एक महत्त्वाचा टप्पा असतो, अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : आपली स्वतःची मालकी असलेलं हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. आयुष्यात घर खरेदी करणं, हा एक महत्त्वाचा टप्पा असतो, अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात. घर खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते आणि प्रत्येकाकडेच एवढा पैसा असेल असं नाही. त्यामुळे लोक घराचं डाउन पेमेंट करण्यासाठी रक्कम जमा करतात आणि उर्वरित पैशांसाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून होम लोनचा पर्याय निवडतात.

होम लोन आहा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार आहे. यामध्ये तुम्ही तुमची प्रॉपर्टी कर्जाच्या बदल्यात सावकाराकडे गहाण ठेवत असता. मुदतीच्या शेवटी कर्जाची पूर्णपणे परतफेड झाल्यानंतर कर्जदाराला प्रॉपर्टीची संपूर्ण मालकी मिळते. जर तुम्हीदेखील होम लोन घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, ते जाणून घेऊयात.

हेही वाचा -   Post Office Scheme : फक्त 95 रुपये गुंतवा आणि मिळवा 14 लाख रुपयांचा रिटर्न

होम लोनसाठी आवश्यक कागदपत्रं पुढीलप्रमाणे आहेत

ओळखपत्र (कोणतंही एक) आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड

ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट,

अॅड्रेस प्रूफ (कोणतंही एक) वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टीची पावती

मालमत्ता कराची पावती, पोस्ट-पेड मोबाइल बिल,मालमत्तेची कागदपत्रं

विक्री करार, अलॉटमेंट लेटर किंवा विक्रीचा शिक्का मारलेलं अग्रीमेंट, मालमत्तेच्या बांधकाम खर्चाचे तपशीलवार इस्टिमेशन,

पझेशन सर्टिफिकेट आणि लँड टॅक्स पावती, बँक अकाउंट स्टेटमेंट, सेलर किंवा विक्रेत्याला पैसे दिल्याची पावती, ऑक्युपसी सर्टिफिकेट (बांधलेल्या अपार्टमेंटच्या बाबतीत)

इतर कागदपत्रं

पासपोर्ट साईझ फोटो, व्यवसाय असलेल्या अर्जदारांसाठी - व्यवसाय असल्याचा पुरावा, फायनॅन्शिअल स्टेटमेंट आणि गेल्या सहा महिन्यांचं बँक अकाउंटचं स्टेटमेंट

होम लोनसाठी अर्ज करण्याची प्रॉसेस

- तुम्ही ज्या बँकेकडून होम लोन घेणार असाल, तिथे जा आणि अर्ज भरा. तुम्हाला तुमचं नाव, व्यवसाय, इन्कम डिटेल्स आणि पुरावा, पत्ता, फोन नंबर आणि शिक्षणाबद्दलची माहिती द्यावी लागेल. वर नमूद केलेल्या सर्व माहितीचा पुरावा देणं गरजेचं असेल.

- अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कर्ज देणाऱ्याला प्रक्रिया शुल्क द्यावं लागेल. तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी आणि तुमच्या मालमत्तेची व्हॅल्यु आणि बँकेद्वारे तिच्या मालकीची तपासणी करण्यासाठी हे शुल्क आकारलं जातं. प्रत्येक बँकेची फी वेगवेगळी असते आणि ती कर्जाच्या रकमेच्या टक्केवारीच्या स्वरूपात असते.

- तुमचा कर्ज अर्ज मंजूर करायचा की नाही, याचा निर्णय बँक साधारणपणे पाच वर्किंग डेजमध्ये घेते. कर्जाबद्दल चर्चा करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कॉल येऊ शकतो.

- होम लोनसाठी तुमची पात्रता तपासण्यासाठी कर्ज देणारा कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू करतो. बँकेचे अधिकारी तुमच्या घरी भेट देऊ शकतात आणि तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी संपर्कदेखील करू शकतात.

- याव्यतिरिक्त कर्ज देताना तुमचा CIBIL स्कोअर आणि क्रेडिट कार्ड रिपोर्ट विचारात घेतला जातो. सर्वकाही समाधानकारक आढळल्यास तुमचा कर्ज अर्ज पुढे पाठवला जातो, नाहीतर तो नाकारला जातो.

- तुमचं होम लोन मंजूर झाल्यास तुम्हाला कर्जाची रक्कम, व्याजदर, व्याजाचा प्रकार (निश्चित किंवा बदलणारा), कर्जाचा कालावधी आणि अटी व शर्ती यांसारखी माहिती देणारे एक अॅक्सेप्टन्स लेटर पाठवेल. तुम्ही ते लेटर स्वीकारल्यावर तुम्हाला सही करावी लागेल आणि त्याची एक कॉपी बँकेला पाठवावी लागेल.

- अॅक्सेप्टन्स लेटरवर सही केल्यानंतर तुम्हाला वन-टाइन सिक्युअर फीदेखील भरावी लागेल.

– तुम्ही ज्या प्रॉपर्टीसाठी कर्ज मागत आहात तिच्या कायदेशीर आणि टेक्निकल तपासणी करण्यासाठी बँक जाईल. या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद आहे की नाही हे तपासण्यासाठी अधिकारी संबंधित ठिकाणी भेट देतील.

–एकदा व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला लोन अग्रिमेंटवर सही करावी लागेल, त्यानंतर बँक तुम्हाला होम लोनची रक्कम देईल.

First published:

Tags: Home Loan, Money