मुंबई, 10 नोव्हेंबर : IPO मार्केटमध्ये रोज काही नवीन अपडेट येत असतात. या सर्व अपडेट्सवर गुतंवणूकदारांची नजर असते. कारण IPO मधील गुंतवणूक फायदेशीर मानली जाते, कारण कमी वेळेत जास्त रिटर्न यातून होतात. आज म्हणजे बुधवारी Nykaa च्या धमाकेदार एन्ट्रीनंतर आणखी एक IPO बाजारात येण्याच्या तयारीत आहे. ऑनलाइन फार्मसी प्लॅटफॉर्म PharmEasy ची मूळ कंपनी API Holdings ने कंपनीच्या IPO साठी SEBI कडे DRHP दाखल केला आहे. कंपनी या IPO मधून 6,250 कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे.
API Holdings हा IPO पूर्णपणे ताज्या इश्यूवर आधारित असेल. याद्वारे कंपनी आपल्या व्यावसायिक गरजांसाठी पैसा उभा करेल. या इश्यूमध्ये कोणतीही ऑफर फॉर सेल असणार नाही, म्हणजेच प्रोमोटर किंवा इतर भागधारक या इश्यूमधील त्यांचा कोणताही हिस्सा विकणार नाहीत.
1,929 कोटी रुपयांची कर्ज परतफेड
कंपनी 1,250 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या खाजगी प्लेसमेंटचा विचार करू शकते. IPO पूर्वी प्लेसमेंट केल्यास, इश्यूचा आकार कमी होईल. कंपनी IPO मधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर 1,929 कोटी रुपयांच्या थकित कर्जासह इतर कारणांसाठी करेल.
IPO News: 15 नोव्हेंबरला आहे जबरदस्त कमाईची संधी, येतोय आणखी एका कंपनीचा आयपीओ
API Holdings हे आघाडीचे डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये Prosus Ventures, TPG Growth, Temasek, CDPQ, LGT LightRock, Eight Rhodes आणि Think Investments यांचा समावेश आहे. एपीआय होल्डिंग डायग्नोस्टिक कंपनी थायरोकेअरचे अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेत आहे. थायरोकेअरमध्ये कंपनीचा बहुसंख्य हिस्सा असेल.
Kotak Mahindra Capital Company Ltd, Morgan Stanley India Company Private Ltd, BoFA Securities India Limited, Citigroup Global Markets India Private Ltd, JM Financial Ltd यासारख्या कंपन्या या IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर असतील.
Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील शेअरमधून गुंतवणूकदार मालामाल
Nykaa चे शेअर्समध्ये 90 टक्क्यांची वाढ
ब्यूटी आणि फॅशन रिटेलर Nykaa च्या IPO ने बुधवारी लिस्ट झाल्यानंतर गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअर बाजारात Nykaa च्या लिस्टसह त्याची संस्थापक फाल्गुनी नायर या देश आणि जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सामील झाल्या आहेत. Nykaa च्या शेअर्समध्ये लिस्टिंग झाल्यानंतर सुमारे 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market