Home /News /money /

PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर जाहीर, चेक करा नवीन दर

PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर जाहीर, चेक करा नवीन दर

लहान बचत योजनांचे व्याजदर तिमाही आधारावर अधिसूचित केले जातात. एक वर्षाची मुदत ठेव योजना दुसऱ्या तिमाहीतही 5.5 टक्के व्याजदरावर राहील.

    मुंबई, 1 जुलै : महागाई (Inflation) आणि वाढत्या व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर सरकारने 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत NSC आणि PPF सह लहान बचत योजनांवरील (Savings Scheme) व्याजदरात बदल केलेला नाही. 2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून लहान बचत योजनांवरील व्याजदरात सुधारणा करण्यात आलेली नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अनुक्रमे 7.1 टक्के आणि 6.8 टक्के वार्षिक व्याजदर देत राहतील. 'जागरण' वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी विविध लहान बचत योजनांवरील व्याजदरात बदल होणार नाही. पहिल्या तिमाहीसाठी सूचित केलेले दर, 1 जुलै 2022 पासून सुरू होणारे आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी संपेपर्यंत कायम राहतील. अर्थ मंत्रालयाने 30 जून 2022 रोजी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. लहान बचत योजनांचे व्याजदर तिमाही आधारावर अधिसूचित केले जातात. एक वर्षाची मुदत ठेव योजना दुसऱ्या तिमाहीतही 5.5 टक्के व्याजदरावर राहील. Gold Rae Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण, स्वस्तात सोनं खरेदीची संधी देशातील सर्वात मोठी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने महागाईवर मात करण्यासाठी बेंचमार्क दरात सलग दोन 90 बेसिस पॉइंट्स वाढ केल्यानंतर एक वर्षाच्या मुदत ठेवींवरील व्याज दर 5.10 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मे आणि जूनमध्ये रेपो दरात अनुक्रमे 40 बेसिस पॉईंट आणि 50 बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 7.04 टक्क्यांवर होता. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवलं, सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होणार? कोणत्या योजनेवर किती व्याज मिळेल? पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्के राहील. ज्येष्ठ नागरिकांना योजनेचे व्याज तिमाही आधारावर दिले जाते. मुलींची बचत योजना सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळेल. बचत ठेवींवरील व्याज दर वार्षिक 4 टक्के राहील. एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.5-6.7 टक्के व्याज दर मिळेल, जो तिमाहीत दिला जाईल. तर पाच वर्षांच्या आवर्ती ठेवींवर 5.8 टक्के जास्त व्याजदर मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, PPF

    पुढील बातम्या