Home /News /money /

IPO News : Anand Rathi Wealth आज ओपन होणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी

IPO News : Anand Rathi Wealth आज ओपन होणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी

कंपनीला Anand Rathi Wealth या IPO च्या माध्यमातून 660 कोटी रुपये उभे करायचे आहेत. हा IPO पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) असेल, म्हणजेच त्यात नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत.

    मुंबई, 2 डिसेंबर : मुंबईतील फायनान्शियल सर्विसेस ग्रुप आनंद राठीचा एक युनिट आनंद राठी वेल्थचा IPO (Anand Rathi Wealth) आज म्हणजे 2 डिसेंबरला ओपन होईल आणि 6 डिसेंबरला बंद होईल. कंपनीने आयपीओसाठी आपला प्राइस बँड (IPO Price Band) निश्चित केला आहे. कंपनीने प्रति शेअर 530 ते 550 रुपये किंमतीचा बँड निश्चित केला आहे. 660 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट कंपनीला या IPO च्या माध्यमातून 660 कोटी रुपये उभे करायचे आहेत. हा IPO पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) असेल, म्हणजेच त्यात नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. या OFS अंतर्गत, कंपनीचे विद्यमान भागधारक त्यांचे 1.2 कोटी इक्विटी शेअर्स विकतील. विक्रीच्या ऑफरमध्ये, आनंद राठी फायनान्शियल सर्व्हिसेस 92.85 लाख इक्विटी शेअर्स आणि आनंद राठी, प्रदीप गुप्ता, अमित राठी, प्रीती गुप्ता, सुप्रिया राठी, रावल फॅमिली ट्रस्ट आणि फिरोज अझीझ यांचे प्रत्येकी 3.75 लाख शेअर्स विकतील. याशिवाय जुगल मंत्री 90,000 शेअर्स विकणार आहेत. या इश्यूमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 2.5 लाख शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. गुंतवणूक मर्यादा आनंद राठी वेल्थ IPO साठी गुंतवणूकदार लॉटमध्ये बोली लावू शकतात. एका लॉटमध्ये कंपनीचे सुमारे 27 शेअर्स असतील. जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावली जाऊ शकते. IPO च्या अप्पर प्राइस बँडनुसार, गुंतवणूकदाराला एका लॉटसाठी बोली लावण्यासाठी 14,850 रुपये गुंतवावे लागतील. तर जास्तीत जास्त 13 लॉट साइजसाठी बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना 1,93,050 रुपये गुंतवावे लागतील. ग्रे मार्केटमध्ये किंमत आयपीओ वॉचनुसार, आनंद राठी वेल्थचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये 125 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेंड करत आहेत. लिस्टिंग डेट कंपनीचे शेअर्स 14 डिसेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचिबद्ध होण्याची अपेक्षा आहे. कंपनीबद्दल जाणून घ्या आनंद राठी वेल्थ वित्तीय सेवा उद्योगात व्यवसाय करतात. त्याचे लक्ष म्युच्युअल फंड वितरण आणि इतर आर्थिक उत्पादनांच्या विक्रीवर आहे. कंपनीने 2002 मध्ये AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक म्हणून व्यवसाय सुरू केला. 31 मार्च 2019 ते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत, कंपनीच्या मालमत्ता व्यवस्थापन (AUM) मध्ये वार्षिक आधारावर 22.74 टक्के वाढ झाली आहे आणि ती 302 अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. ऑगस्ट 2021 पर्यंत, कंपनीच्या फ्लॅगशिप वेल्थ व्हर्टिकलचे देशभरात 6564 क्लायंट होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या