स्वातंत्र्यदिनापूर्वी आनंद महिंद्रा खास VIDEO; सोशल मीडियावरही केला शेअर

स्वातंत्र्यदिनापूर्वी आनंद महिंद्रा खास VIDEO; सोशल मीडियावरही केला शेअर

आनंद महिंद्रा (anand mahindra) स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने (independence day दरवर्षी हा एकच व्हिडीओ पाहतात. हा व्हिडीओ त्यांच्यासाठी खूप विशेष आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day)  साजरा होता आहे. अनेक सरकारी इमारती तिरंगी रंगात झगमगू लागल्या आहेत. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हिडीओ शेअर होऊ लागले आहेत. महिद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीदेखील आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे आनंद महिंद्रा दरवर्षी स्वातंत्र्यदिनापूर्वी हा व्हिडीओ पाहतात.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक छोटा मुलगा राष्ट्रगीत गातो आहे. आपण दरवर्षी यादिवशी हा व्हिडीओ पाहतो, असं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे. या व्हिडीओमुळे आपल्यामध्ये एक जोष येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे की, "हा व्हिडीओ मी एक वर्षापूर्वी किंवा त्याआधीही पाहिला आहे. हा व्हिडीओ मी स्वत:कडे सांभाळून ठेवला आणि दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत हा मी हा व्हिडीओ पाहतो"

हे वाचा - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई सजली तीन रंगात! शेअर करावेत असे PHOTO

"या व्हिडीओत आपलं राष्ट्रगीत आहे. या मुलाने गायलेलं राष्ट्रगीत ऐकून मी तितकाच प्रेरित होतो, जितकं एखाद्या प्रसिद्ध किंवा अनुभवी संगीतकाराने गायल्यानंतर होतो. या मुलाचा निरागसपणा आणि एकाग्रतेमुळे मी नेहमी प्रभावित होतो, असंही त्यांनी सांगितलं.

महिंद्रा अँड महिंद्रा हे भारतातील प्रमुख 10 औद्योगिक घरांण्यांपैकी एक आहेत.  आनंद महिंद्रा हे केवळ त्यांच्या व्यावसायिक कामासाठी ओळखले जात नाहीत, तर सर्वसामान्यांमध्येही त्यांची लोकप्रियता अफाट आहे.

हे वाचा - 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का? तारीख, वेळेमागील इतिहास

ज्या लोकांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचणे ही आनंद महिंद्रा यांची खासियत आहे. एखाद्या व्यक्तीने केलेल्या स्तुत्य कामाबद्दल चर्चा असो. ते केवळ ट्विट करुन थांबत नाहीत तर थेट मदतीची ऑफरदेखील देतात.

सीएसआरअंतर्ग त्यांनी Rise for Good कार्यक्रम सुरू केला आहे. यात आरोग्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, यासह अनेक विषयांवर काम केले जात आहे. कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेले लोक या कार्यक्रमांशी थेट जोडलेले असतात. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.

Published by: Priya Lad
First published: August 14, 2020, 11:05 PM IST

ताज्या बातम्या