मराठी बातम्या /बातम्या /मनी /

महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका! अमूल दूध महागलं, चेक करा नवीन दर

महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका! अमूल दूध महागलं, चेक करा नवीन दर

Amul Milk Price Hike: अमूल गोल्डच्या 500 ग्रॅमची नवीन किंमत आता 31 रुपये असेल, तर अमूल टाझाची 500 ग्रॅमची नवीन किंमत 25 रुपये झाली आहे.

Amul Milk Price Hike: अमूल गोल्डच्या 500 ग्रॅमची नवीन किंमत आता 31 रुपये असेल, तर अमूल टाझाची 500 ग्रॅमची नवीन किंमत 25 रुपये झाली आहे.

Amul Milk Price Hike: अमूल गोल्डच्या 500 ग्रॅमची नवीन किंमत आता 31 रुपये असेल, तर अमूल टाझाची 500 ग्रॅमची नवीन किंमत 25 रुपये झाली आहे.

  मुंबई, 16 ऑगस्ट : महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. अमूल दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अमूल दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 17 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून लागू होतील. चेक करा नवीन दर अमूल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर  मुंबई, अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर आणि पश्चिम बंगालमध्ये लागू होतील. नवीन किमतींनुसार, अमूल शक्ती दूध आता 50 रुपये प्रति लिटर, अमूल गोल्ड आता 62 रुपये प्रति लिटर आणि अमूल ताझा 56 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. दुधाचा उत्पादन आणि ऑपरेशन खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तूर डाळीला महागाईचा तडका! केंद्र सरकारचा किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा निर्णय

  सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता

  दुधाची किंमत का वाढवली? दूध उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असल्याचे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे म्हणणे आहे. ही वाढ ऑपरेशन आणि उत्पादनाच्या एकूण खर्चात वाढ झाल्यामुळे झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पशुखाद्याच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अमूलने सांगितले. अमूलने निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या खर्चाच्या पार्श्‍वभूमीवर आमच्या सदस्य दूध संघानी शेतकर्‍यांच्या दुधाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 8-9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. या वाढलेल्या खर्चाचा काही भाग आता ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. मदर डेअरीचं दूधही महागलं अमूल पाठोपाठ मदर डेअरीनेही आपल्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. मदर डेअरीचं फुल क्रीम दूध आज 59 रुपये लिटरला मिळत आहे. उद्यापासून ते ग्राहकांना 2 रुपयांच्या वाढीव किमतीसह 61 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर टोन्ड दुधाला 51 रुपये प्रतिलिटर, तर गायीच्या दुधाला 53 रुपये प्रतिलिटर दर असेल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Inflation, Money

  पुढील बातम्या