मुंबई : महागाईमुळे आधीच खिशाला मोठी कात्री लागली आहे. आता त्यात आणी जीवनावश्यक असलेल्या दुधाच्या किंमती देखील वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे आता दही आणि दुग्धजन्य पदार्थांच्य किंमती वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. अमूलचे दूध महाग झाले आहे. दुधाच्या दरात एका झटक्यात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. हा निर्णय 2 फेब्रुवारीला घेण्यात आला असून 3 फेब्रुवारीपासून ही दरवाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अमूलचं दूध घेणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
अमूल फ्रेश अर्धा लीटर दुधासाठी 27 रुपये मोजावी लागेल तर एक लीटर दुधासाठी 54 रुपये मोजावी लागणार आहे. 2 लिटर किंमतीसाठी 108 रुपये होणार आहे.
5 लाख उत्पन्न असेल तर कोणता TAX Slab फायदेशीर?
Budget 2023: ग्रीन ग्रोथ म्हणजे काय रे भाऊ? बजेटमध्ये का दिलाय प्राधान्यक्रम?
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने माहिती दिली आहे की अमूल फ्रेश 6 लीटरची किंमत आता 224 रुपये असेल, तर अमूल गोल्ड 500 मिलीची किंमत आता 33 रुपये करण्यात आली आहे.
या वाढीनंतर अमूल गोल्डचा दर 66 रुपये, अमूल ताजा 54 रुपये प्रतिलिटर, अमूल गायीच्या दुधाचा दर 56 रुपये आणि अमूल A2 म्हशीच्या दुधाचा दर 70 रुपये प्रति लिटर होणार आहे. अमूलने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी दरवाढ केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.