मराठी बातम्या /बातम्या /मनी /विरोधकांची एकजूट फक्त TRP साठी, 2024 ला पुन्हा.... अमित शाहांनी वर्तवलं भाकित

विरोधकांची एकजूट फक्त TRP साठी, 2024 ला पुन्हा.... अमित शाहांनी वर्तवलं भाकित

2024 ला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार असं अमित शाह यांनी भाकित केलं आहे.

2024 ला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार असं अमित शाह यांनी भाकित केलं आहे.

2024 ला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार असं अमित शाह यांनी भाकित केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी बुधवारी रायझिंग इंडिया कार्यक्रमात मोठे खुलासे केले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकित केलं आहे. विरोधकांची एकजूट फक्त TRP मिळवण्यासाठीच आहे. बाकी कशासाठी नाही, 2024 ला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार असं अमित शाह यांनी भाकित केलं आहे.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने जेवढी मतं मिळवली त्यापेक्षा जास्त मतं 2024 मध्ये मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाह पुढे म्हणाले, विचार करा चंद्रशेखर राव यांनी उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतली तर काय फरक पडेल? ममता बॅनर्जींनी तेलंगणात सभा घेतल्याने काही फरक पडेल का? किंवा (अखिलेश) यादव साहेबांनी बंगालमध्ये सभा घेतल्या तर काय फरक पडणार?'

" isDesktop="true" id="857988" >

हे सगळे भाजप विरोधात आहेत. ते एकमेकांसाठी जागाही सोडायला तयार आहेत. मला मान्य आहे की तेलंगणात टीआरएसने ममताजींना ५ जागा दिल्या तर लढत होईल. समाजवादी पक्षानेही द्यावा आणि ममताजींनी बंगालमध्ये दोघांना ५-५ जागा द्याव्यात, तरच ते एकत्र येतील. पण भाजपसमोर प्रत्येकजण आपापली लढाई लढेल आणि म्हणेल की आम्ही सर्व एक आहोत, आम्ही एक आहोत का?'

त्यामुळे अमित शाह यांनी जे भाकित वर्तवलं ते खरं होणार का याची प्रतीक्षा तर आहेच. पण आता कर्नाटकमध्ये भाजपला कमळ फुलवण्यात यश मिळणार का याकडे संपूर्ण देशाच्या नजरा आहेत.

First published:
top videos

    Tags: Amit Shah, Election