Home /News /money /

Petrol-Diesel Prices Today: क्रूड ऑइलच्या वाढीदरम्यान IOCL कडून नवे दर जारी, पाहा आजचा पेट्रोल-डिझेल भाव

Petrol-Diesel Prices Today: क्रूड ऑइलच्या वाढीदरम्यान IOCL कडून नवे दर जारी, पाहा आजचा पेट्रोल-डिझेल भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलमध्ये (Crude Oil) वाढ होत असताना आयओसीएलने (IOCL) आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Prices Today) नवे दर जारी केले आहेत.

  नवी दिल्ली, 25 जानेवारी : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलमध्ये (Crude Oil) वाढ होत असताना आयओसीएलने (IOCL) आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Prices Today) नवे दर जारी केले आहेत. किमतीत आजही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाहन इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 पासून बदल झालेला नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलमध्ये चढ-उतार सुरू आहेत. क्रूड ऑइलचा दर 69 डॉलर प्रति बॅरल ते 85 डॉलरदरम्यान चढ-उतार आहे. आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. देशातील प्रमुख शहरांत आजचा भाव – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर – लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लीटर

  हे वाचा - शेअर बाजारातील पडझडीदरम्यान टॉप पिक्स, या शेअर्समध्ये 3-4 आठवड्यात चांगल्या कमाई

  महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल दर (Today's Petrol and Diesel Prices in Maharashtra) 
  शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
  पुणे109.45 रुपये92.25 रुपये
  मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
  नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
  नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
  अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
  औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
  रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
  रायगड109.48 रुपये92.25 रुपये
  परभणी112.49 रुपये95.17 रुपये
  पालघर109.75 रुपये92.51 रुपये
  सांगली110.03 रुपये92.83 रुपये
  कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये
  असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर  पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

  हे वाचा - मुलीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक!

  देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

  पुढील बातम्या