Valentine's Day : जगातल्या या सगळ्यात श्रीमंत माणसाने गर्लफ्रेंडला दिलं 1200 कोटींचं गिफ्ट

Valentine's Day : जगातल्या या सगळ्यात श्रीमंत माणसाने गर्लफ्रेंडला दिलं 1200 कोटींचं गिफ्ट

अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस हे जगातले सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. या व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने त्यांनी त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझसाठी 1200 कोटी रुपयांचं महागडं गिफ्ट दिलंय.

  • Share this:

मुंबई, 13 फेब्रुवारी : अ‍ॅमेझॉनचे (Amazon)संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस हे जगातले सर्वात श्रीमंत उद्योगपती (World Most Richest Man)आहेत. या व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने त्यांनी त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझसाठी 1200 कोटी रुपयांचं महागडं गिफ्ट दिलं आहे.

CNBC ने दिलेल्या बातमीनुसार, लॉरेन सांचेझ (Jeff Bezos Girlfriend Lauren)बराच काळ नवं घर शोधत होती. अखेर तिने एक घर पसंत केलं. वॉलस्ट्रीट जर्नलच्या खबरीनुसार बेझोस यांनी ही वॉर्नर इस्टेट मीडिया व्यावसायिक डेव्हिड गेफेन यांच्याकडून घेतली आहे.

सगळ्यात महागडा सौदा

लॉस एंजेलिसमध्ये एखाद्या निवासी इमारतीचा झालेला हा सगळ्यात महागडा सौदा आहे. याआधी 2019 मध्ये लाशन मर्डोक यांनी बेल एअर इस्टेट 15 कोटी डॉलरना विकत घेतली होती. अमेरिकेची ई कॉमर्स कंपनी असेलल्या अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांची संपत्ती आजच्या घडीला 131.3 अब्ज डॉलर्स एवढी आहे. जेफ बेझोस हे जगातले सर्वात श्रीमंत व्यावसायिक आहेत. जेफ बेझोस यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडला दिलेलं घर 9 एकरमध्ये विस्तारलं आहे. ही हवेली जॉर्जियन शैलीत साकारली आहे.

(हेही वाचा : 'व्हॅलेंटाइन डे' : रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं)

'ताजमहाल'ला भेट

या हवेलीमध्ये टेरेस आणि गार्डनही आहे. दोन गेस्ट हाऊस, नर्सरी, 3 हॅटहाऊस, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, 9 होल गोल्फ कोर्स, मोटर कोर्ट, सर्व्हिस गॅरेज, गॅस पंप असा सगळा जामानिमा इथे आहे.जेफ बेझोस जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्या या गर्लफ्रेंडसोबत त्यांनी 'ताजमहाल' ला भेट दिली होती. प्रेमाच्या या स्मारकासमोर त्यांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर खूपच गाजले.

==================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 03:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading