Elec-widget

रविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतलं काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये

सुट्टीच्या दिवशी कंपनीने काम करुन घेतल्यानंतर कर्मचारी महिलेने व्यवस्थापनाविरोधात तक्रार दाखल केली.

  • Share this:

सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी काम केल्याबद्दल कंपनी त्या दिवशीचे वेतन कामगाराला देते. त्यापलिकडं ज्या सुविधा असतील त्या पुरवल्या जातात. पण एका कंपनीला कर्मचाऱ्याकडून रविवारी काम करून घेतल्याबद्दल थोडे थोडके नाही तर तब्बल 150 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

अमेरिकेतील मियामी शहरात मेरी जीन पियरे हिने दहा वर्ष एका अलिशान हॉटेलमध्ये काम केलं. मेरीने कंपनीत रुजू होताना आपण रविवारी काम करू शकत नसल्याचे हॉटेल व्यवस्थापनाला सांगितले होते.

मेरी सोल्जर्स ऑफ क्राइस्ट चर्चमध्ये मिशनरी म्हणून काम करत होती. मेरीने सांगितले की, माझी देवावर श्रद्धा आहे आणि रविवारी मी काही काम करत नाही. या दिवशी मी देवाची प्रार्थना करते.

Loading...

हॉटेल प्रशासनाने मेरीच्या धार्मिक भावनांचा आदर राखला. तिला खूप कमी वेळा अपवादात्मक परिस्थितीत रविवारी कामावर यावे लागले. पण 2015 मध्ये मात्र किचन मॅनेजरने तिची ड्युटू रविवारी लावली.  मेरीने हॉटेलविरोधात तक्रार दाखल केली.

हॉटेल प्रशासनाने मेरीच्या धार्मिक भावनांचा आदर राखला. तिला खूप कमी वेळा अपवादात्मक परिस्थितीत रविवारी कामावर यावे लागले. पण 2015 मध्ये मात्र किचन मॅनेजरने तिची ड्युटू रविवारी लावली.
मेरीने हॉटेलविरोधात तक्रार दाखल केली.

आपली तक्रारीबद्दलचा उल्लेख मेरीने पादरीला पाठवलेल्या पत्रातही केला होता. तिनं म्हटलं होतं की, सबबाथच्या दिवशी काम करण्याने धार्मिक विश्वासाला तडा जातो आणि मॅनेजरने ड्युटी लावून एक प्रकारे अपमान केला आहे.

नव्या हॉटेल प्रशासनाने मेरीला रविवारच्या सुट्टीसाठी इतर कामगारांसोबत बदली सुट्टी घेण्यास भाग पाडले. मार्च 2016 मध्ये मेरीवर बेजबाबदारपणाचा आरोप करत कामावरून काढून टाकण्यात आलं.

कामावरून काढल्यानंतर मेरीने इक्वल अपॉर्च्युनिटी कमिशनकडे याविरोधात तक्रार दाखल केली. हॉटेलने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मेरीने केला आहे.

या प्रकरणी मेरीला तब्बल दीडशे कोटी रुपये देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. असे असले तरी त्यापैकी केवळ 2 कोटी रुपये मेरीला मिळणार आहेत. तर या निर्णयाविरोधात अपिल करणार असल्याचे हॉटेल प्रशासनाने म्हटलं आहे.

वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत मेरीने सांगितले की, माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे नाहीत. मला एवढंच सांगायचं होतं की कार्पोरेटकडे भावना नाहीत त्यांना फक्त व्यवसाय दिसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...