...म्हणून चीनमधून Amazon गाशा गुंडाळतेय

...म्हणून चीनमधून Amazon गाशा गुंडाळतेय

आता अ‍ॅमेझाॅनवर चीनच्या स्थानिक विक्रेत्यांचं सामान विकलं जाणार नाही.

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : जगातली सर्वात मोठी ई काॅमर्स कंपनी अ‍ॅमेझाॅन आता चीनमधून आपला कारभार बंद करणार आहे. कंपनीनं चिनी आॅनलाइन कंपनींसमोर आपली हार मान्य केली आहे. कंपनीनं घोषणा केलीय की चिनी मार्केटप्लस बिझनेस जुलैपासून बंद होणार आहे. म्हणजे आता अ‍ॅमेझाॅनवर चीनच्या स्थानिक विक्रेत्यांचं सामान विकलं जाणार नाही. आता या अ‍ॅमेझाॅनवर ग्राहकांना देशाबाहेरची उत्पादनं मिळतील. पण यामुळे अ‍ॅमेझाॅनला मोठं नुकसान सहन करावं लागेल.

चीनच्या ई काॅमर्स बाजारात Alibaba अलिबाबा आणि JD.com यांचं नाव मोठं आहे. नवा अॅप Pinduoduo ही अ‍ॅमेझाॅनला चांगलंच टक्कर देतंय. म्हणूनच चीनमध्ये काम करणं अ‍ॅमेझाॅनला कठीण झालं होतं. चीनच्या ई काॅमर्समधून बाहेर पडणं म्हणजे अ‍ॅमेझाॅनचं मोठं अपयश समजलं जातंय.

2004पासून अ‍ॅमेझाॅन चीनमध्ये आहे

अ‍ॅमेझाॅननं 2004मध्ये चिनी आॅनलाइन बुक स्टोअर 520 कोटी रुपयांनी खरेदी केलं होतं आणि आपला कारभार सुरू केला होता. तेव्हापासून कंपनीनं वेअरहाऊसेज आणि डाटा सेंटरमध्ये गुंतवणूक केली होती. कंपनीनं चिनी विक्रेत्यांना आपलं सामान अ‍ॅमेझाॅनवर विकण्याचं ट्रेनिंगही दिलं.

2016मध्ये अ‍ॅमेझाॅननं चीनमध्ये Prime Membership प्रोग्रॅम सुरू केला. उच्च प्रतीच्या पाश्चात्य वस्तू आणि मोफत आंतरराष्ट्रीय डिलिव्हरीसारख्या सुविधा ग्राहकांना आकर्षित करतील असं वाटलं होतं. पण प्राइम व्हिडिओसारखे जादा फायदे ग्राहकांना उपलब्ध झाले नाहीत.

सूत्रांच्या माहितीनुसार अ‍ॅमेझाॅन भारतावर जास्त लक्ष देण्यासाठी चीनमधून बाहेर पडतेय. चीनमध्ये अ‍ॅमेझाॅनचा वाटा 1 टक्के होता. तर भारतात ही कंपनी मुख्य ई काॅमर्स बनण्याची शक्यता आहे. अ‍ॅमेझाॅनला भारतातही चिनी ई काॅमर्स कंपनींशी टक्कर द्यावी लागेलच. इथेही अलिबाबा आणि इतर चिनी कंपनीज आपले हातपाय पसरतायत. या कंपन्या Paytm आणि BigBasketमध्ये गुंतवणूक करतायत.

करकरेंबाबत साध्वींच्या वक्तव्यावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

First published: April 19, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading