• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • कोणत्याही शुल्काशिवाय मिळवा ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड, Amazon Pay देत आहे ही ऑफर; वाचा सविस्तर

कोणत्याही शुल्काशिवाय मिळवा ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड, Amazon Pay देत आहे ही ऑफर; वाचा सविस्तर

तुम्ही नवं क्रेडिट कार्ड (New Credit Card) घेण्याच्या विचारात आहात का? किंवा तुम्हाला तुमचं जुनं क्रेडिट कार्ड अपग्रेड करून बँकेचं क्रेडिट कार्ड घ्यायचंय का? मग एक चांगली संधी आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 27 जुलै: तुम्ही नवं क्रेडिट कार्ड (New Credit Card) घेण्याच्या विचारात आहात का? किंवा तुम्हाला तुमचं जुनं क्रेडिट कार्ड अपग्रेड करून बँकेचं क्रेडिट कार्ड घ्यायचंय का? मग एक चांगली संधी आहे. कारण ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड मोफत म्हणजेच कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध करण्यात आलं आहे. ICICI बँक आणि Amazon Pay यांनी मिळून आतापर्यंत 20 लाख क्रेडिट कार्ड्स दिली आहेत. हे क्रेडिट कार्ड 2018मध्ये सादर करण्यात आलं होतं. या कार्डचे अनेक फायदे असल्यानेच एवढ्या कमी कालावधीत 20 लाखांहून अधिक ग्राहकांनी ही कार्ड्स घेतल्याचं बँकेनं म्हटलं आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाचे रजिस्टर्ड ग्राहक या कार्डसाठी डिजिटल स्वरूपात (Digital Application) अर्ज करू शकतात. ते ग्राहक आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असण्याची आवश्यकता नाही. भारतातलं हे असं पहिलं क्रेडिट कार्ड आहे, की ज्यासाठीची केवायसी सुविधा (Video KYC) व्हिडीओ स्वरूपात देण्यात येते. ही सुविधा जून 2020 मध्ये सादर करण्यात आली होती. या क्रेडिट कार्डच्या बिलिंग सायकलच्या तारखेनंतर अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) बॅलन्समध्ये रिवॉर्ड पॉइंट्स क्रेडिट केले जातात. या क्रेडिट पॉइंट्सचा उपयोग 16 कोटींहून अधिक प्रॉडक्ट्सच्या खरेदीसाठी होऊ शकतो. हे वाचा-IRCTC देत आहे 1,00,000 रुपये जिंकण्याची संधी, तुम्हाला करावं लागेल हे एक काम काय आहेत फीचर्स? - ICICI बँक आणि Amazon Pay यांच्या संयुक्त विद्यमाने दिलं जाणारं हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कोणतीही जॉयनिंग फी (No Joining Fee) नाही. तसंच, कोणतंही वार्षिक शुल्कही (No Yearly Fee) आकारलं जात नाही. हे कार्ड आजीवन निःशुल्क असल्याचं (Lifetime Free Credit Card) कंपन्यांनी म्हटलं आहे. - या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यानंतर रिवॉर्ड पॉइंट्स (Reward Points) मिळतात. - अ‍ॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्सना पाच टक्के रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. Amazon.in वर खरेदी करणाऱ्या अन्य सर्व ग्राहकांना तीन टक्के रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. हे वाचा-BSNL ची जबरदस्त ऑफर; दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा आणि बरचं काही - अ‍ॅमेझॉनवर डिजिटल कॅटेगरीत (म्हणजेच बिल पेमेंट, रिचार्ज) खर्च करणाऱ्यांना दोन टक्के रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार आहेत. - स्विगी, तसंच बुक माय शो आदींवर हे क्रेडिट कार्ड वापरल्यास दोन टक्के डिस्काउंट दिला जात आहे.
First published: