आता Amazon वर बुक करता येणार रेल्वे तिकीट, मिळणार Cashback आणि इतर महत्त्वाचे फायदे

आता Amazon वर बुक करता येणार रेल्वे तिकीट, मिळणार Cashback आणि इतर महत्त्वाचे फायदे

भारतीय रेल्वेने खासगीकरणाकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाने (Amazon India) रेल्वेबरोबर त्यांची भागीदारी बुधवारी जाहीर केली आहे. यामुळे आता अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवर भारतीय रेल्वेचे तिकीट बुक करता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : भारतीय रेल्वेने खासगीकरणाकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाने (Amazon India) रेल्वेबरोबर त्यांची भागीदारी बुधवारी जाहीर केली. प्रवास आणि जेवणाच्या सुविधांमध्ये ही भागीदारी असेल, त्यामुळे अ‍ॅमेझॉनच्या वेबासाइटवरून प्रवाशांना आता रेल्वे तिकिटं बुक करता येणार आहेत.

तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर आता सर्व रेल्वे गाड्यांची उपलब्धता, राखीव सीटची माहिती घेता येणार आहे. शिवाय तुम्ही अ‍ॅमेझॉन वॉलेटमध्ये जर पैसे टाकले तर एका क्लिकवर तुम्हाला तिकिटाचे पैसे भरणं सोपं होणार आहे. पहिल्या तिकिटावर कॅशबॅकची संधी असेल. या भागीदारीमुळे प्रवाशांना अ‍ॅमेझॉनवरून त्यांचं तिकीट डाउनलोड करता येईल शिवाय प्रवास रद्द झाल्यास तिकीट रद्द करणंही सोपे होणार आहे.

जर प्रवाशांनी तिकीट बुक करताना अ‍ॅमेझॉन बॅलन्समधून केले असेल तर तिकीट रद्द केल्यानंतर त्यांना तो रिफंड मिळणंही अधिक सुलभ होणार आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना त्यांच्या पहिल्या तिकीट बुकिंगवर 10 टक्क्यांपर्यंत तर प्राईम मेम्बरला 12 टक्क्यांप्रर्यंत कॅशबॅकची सुविधा असेल. मर्यादित कालावधीसाठी ही योजना असणार आहे. शिवाय काही कालावधीसाठी ट्रान्झॅक्शन चार्जेस वगळले आहेत.अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवर ही सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड, आयओएस युजर्सना डाऊनलोड करता येणार आहे.

(हे वाचा-रोज केवळ 28 रुपये खर्च करून मिळतील 6 फायदे, उपयोगाची आहे LIC ची ही योजना)

तिकिट बुक करताना अ‍ॅमेझॉन पे अ‍ॅपवर गाड्या, श्रेणीं, प्रवासाची तारीख, त्यांचं प्रवासाचं ठिकाण द्यावं लागेल. त्यानंतर अ‍ॅपवर त्यांना गाड्यांच्या उपलब्धतेची माहिती दिली जाईल, शिवाय गाड्यांची यादी या ठिकाणी ग्राहक पाहू शकतील. तिकिट रद्द करण्यासाठी युजर्सना ‘युअर ऑर्डर’ वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्याचप्रमाणे फोन आणि चॅटद्वारे, हेल्पलाइनद्वारे 24 तास मदत उपलब्ध असेल.

(हे वाचा-या शहरात बनतंय भारतातील सर्वात मोठं एअरपोर्ट, होणार 29560 कोटी खर्च)

गेल्या वर्षी अ‍ॅमेझॉननने विमान आणि बस सेवेची तिकीटं बुकिंग सुविधा उपलब्ध करून दिली होती, आता IRCTC सोबत भागीदारी झाल्याने आम्ही खूप उत्सुक आल्याचे अ‍ॅमेझॉन पे चे संचालक विकास बन्सल यांनी म्हटलं आहे. प्रवास अधिक सोयीचा आणि त्याचे तिकीट बुकिंग अधिक सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटले आहे. सध्या भारतात मोबाइल अ‍ॅपचा वापर प्रचंड वाढला आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शन्सही वाढली आहेत. त्यामुळे तरुणाईबरोबरच ज्येष्ठही या अ‍ॅपचा वापर करू लागले आहेत. अ‍ॅपची सहजता आणि अमेझॉनचा विश्वास यामुळे या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 8, 2020, 4:37 PM IST

ताज्या बातम्या