न्यूयॉर्क, 31 जानेवारी : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक आणि अध्यक्ष जेफ बेझोस हा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो. जेफ बेजोसला विश्वाचा महाकुबेर असे म्हटले जाते. ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळ जवळ दहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र आजच फक्त 15 मिनिटांत अॅमेझॉनने 1300 कोटी डॉलर कमवले.
जेफ बेजोसच्या अॅमेझॉनने गुरुवारी तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त कमवले. त्यांन एकूण 12 % वाढ एका दिवसात झाली. त्यामुळं जेफ बेझोसच्या संपत्तीत 15 मिनिटांमध्ये 1300 कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळं जेफ बेझोसची संपत्ती आता जवळजवळ 129.5 मिलियन डॉलर झाली आहे.
वाचा-काय म्हणावं याला! वडिलांकडे 98 कोटींची संपत्ती अन् मुलगा राहतोय भाड्याच्या घरात
Jeff Bezos is $13 billion richer after Amazon delivered strong holiday sales https://t.co/pEZvw0fRHE pic.twitter.com/3eLkF6It56
— Forbes (@Forbes) January 30, 2020
वाचा-VIDEO : बाबा, बायकांवर लय पैसा उडतो! मुलाला झालीय Valentines dayची अॅलर्जी
2030पर्यंत होणार महाखर्वपती
जेफ बेझोस दिवसाला 1200 कोटी कमावतो. म्हणजेच जेफ 2030 पर्यंत जेफ बेझोस महाखर्वपती होऊ शकतो. बेझोसच्या संपत्तीत ज्या पद्धतीने वाढ होत आहे ते पाहता 2030पर्यंत तो 68.5 लाख कोटी रुपयांचा मालक असेल.
वाचा-महिलांना अस्तित्वाची जाणिव करुन देणारी 'थप्पड', पाहा तापसीचा दमदार परफॉर्मन्स
कधी काळी मेकडॉनल्ड्समध्ये करायचा टेबल साफ
1964 साली मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या जेफ बेझोसने मॅकडोनाल्डमध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी प्रथम नोकरी केली. जिथे त्याला सफाईची नोकरी मिळाली. बेझोस जमिनीवर पडलेला कचरा उचलत असे. बेझोसला ही नोकरी अजिबात आवडली नाही. त्यामुळं त्याने लहाणपणीच मोठा उद्योगधंदा उभा करण्याचा निश्चय केला. जेफला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती. त्याने लहाणपणी घेतलेल्या सर्व अनुभवांचा वापर आपल्या कंपनीत केला. त्यामुळेच अमेझॉनचे ही जगातली सर्वात मोठी कंपनी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.