Elec-widget

अमेझाॅननं आणलीय नवी संधी, 'या' अटीवर कंपनी देतेय 7 लाख रुपये

अमेझाॅननं आणलीय नवी संधी, 'या' अटीवर कंपनी देतेय 7 लाख रुपये

अमेझाॅन या मोठ्या ई काॅमर्स कंपनीनं आणलीय पैसे कमवण्याची संधी

  • Share this:

मुंबई, 14 मे : जगातली सर्वात मोठी ई काॅमर्स कंपनी अमेझाॅन ( Amazon )नं आपल्या कर्मचाऱ्यांसमोर नवा प्रस्ताव मांडलाय. कंपनीनं कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून अमेझाॅनसोबत व्यवसाय करायला सांगितलाय. नोकरी सोडून अमेझाॅनसाठी डिलिव्हरी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी आर्थिक मदतही करणार आहे. अमेझाॅन प्राइम मेंबर्ससाठी डिलिव्हरीची वेळ दोन दिवस कमी करून एक दिवस करण्याच्या प्रयत्नात आहे.

Post Office ची खास योजना, रोज 55 रुपये गुंतवून मिळेल 10 लाखांचा विमा

7 लाखापर्यंत खर्च करेल कंपनी

अमेझाॅननं सांगितलं, जे कर्मचारी नोकरी सोडून यात येतील, त्यांच्या स्टार्टअपचा 7 लाख रुपये खर्च कंपनी करेल. त्यांना तीन महिन्यांचा पगारही दिला जाईल. ही आॅफर अर्थ वेळ आणि पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्यात वेअरहाऊस कामगारही आहेत, जे आॅर्डर पॅक करतात. होल फूड्सचे कर्मचारी या आॅफरचा फायदा घेऊ शकत नाहीत.

या आहेत भारतातल्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार्स, कोण आहे नंबर 1?

Loading...

अमेझाॅननं गेल्या वर्षी स्वतंत्र अमेझाॅन डिलिव्हरी व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज मागवले होते. कंपनीच्या प्लॅनप्रमाणे UPS, पोस्ट आॅफिस किंवा इतर कुरियरवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत:च डिलिव्हरी व्यवसाय करू इच्छितेय. हा नवा प्रकल्प त्याचाच एक भाग आहे.

भारतीयांच्या जेवणाची चवच बदलली, तुमची पत्नी तर नाही ना या यादीत?

आतापर्यंत 200 अमेझाॅन डिलिव्हरी बिझनेस तयार

अमेझाॅनच्या ग्लोबल डिलिव्हरी सर्विसेजचे उपाध्यक्ष जाॅन फेल्टन म्हणाले, गेल्या वर्षी जूनमध्ये प्रोग्रॅम लाँच झाल्यानंतर 200 अमेझाॅन डिलिव्हरी बिझनेस तयार झालेत.


विहिरीत आत्महत्या करणाऱ्या महिलेचे ग्रामस्थांनी वाचवले प्राण, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...