अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान एसएमबी ने ई-वाणिज्य संधीसह प्रचंड यशाची गोडी चाखली

वर्षातील सर्वात मोठ्या सेल दरम्यान उत्तर प्रदेश मधील लघु व्यावसायिकांनी त्यांची असाधारण उत्पादने ग्राहकांना विकण्यासाठी ई-वाणिज्य च्या शक्तीचा वापर केला

वर्षातील सर्वात मोठ्या सेल दरम्यान उत्तर प्रदेश मधील लघु व्यावसायिकांनी त्यांची असाधारण उत्पादने ग्राहकांना विकण्यासाठी ई-वाणिज्य च्या शक्तीचा वापर केला

  • Share this:
    आपल्या सभोवतालच्या व्यवसायामध्ये गेल्या काही महिन्यातील आर्थिक अरिष्टामुळे (व्यत्यय आल्यामुळे) एक प्रकारचा मोठा बदल घडवून आणलेला आहे. डिजिटल बदल हा प्रेरित झालेला आहे आणि भारतातील मोठ्या मेट्रो मधून तसेच लहान शहरे आणि गावे यामधून देखील हाच ट्रेंड दिसून येत आहे. या काळात लघु आणि मध्यम व्यवसायांना ई-वाणिज्यशी निगडीत होण्यात आणि ग्राहकांना सेवा पुरवण्यात अधिक स्वारस्य निर्माण झाले आहे. या सणासुदीच्या काळात फहीम शम्सी सारखे विक्रेते, सारखे ते चालू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये आपला व्यवसाय वाढवू पाहत आहेत. निल्सन (नेल्सन) च्या अलीकडील सर्वेक्षणानुसार, 85% पेक्षा अधिक एसएमबी विक्रेते नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या अपेक्षेत आहेत आणि आपल्या विक्रीमध्ये वृद्धी पाहतात, 74% पेक्षा अधिक विक्रेते आपला व्यवसाय पुनुर्जीवीत होईल याविषयी आशावादी आहेत आणि 78% आपल्या उत्पादनांची दृश्यमानता वाढेल याविषयी सकारात्मक आहेत. या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये उत्तर प्रदेश मधील 70,000 पेक्षा अधिक विक्रेते हून जास्त सहभागी होत आहेत. भारतामधील ग्राहकांच्या फर्निचर विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी, वुडन ट्विस्ट त्यांच्या इतर उत्पादनासाहित फ्लोटिंग शेल्फ, वूड सेपरेटर्स आणि लॅपटॉप टेबल यासारख्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी आपला ई-वाणिज्य प्रवास 2015 साली सुरु केला आणि आज ते अ‍ॅमेझॉनवर धडाकेबाज विक्रीचा आनंद घेत आहेत. संस्थापक आणि सीईओ फहीम शम्सी म्हणाले, “या वर्षी तोंड द्याव्या लागलेल्या आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीने व्यवसायासाठी, खास करून एसएमबी साठी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हे एक आदर्श व्यासपीठ आहे. आम्ही पहिल्या तीन दिवसामध्येच 3 पट (तिप्पट) विक्रीची नोंद केली आणि ग्राहक वर्षाच्या या कालावधीत अधिक खरेदी करू पाहतात म्हणून या सणाच्या हंगामात अधिक विक्री होईल अशी आशा बाळगून आहोत.” या वर्षी, अ‍ॅमेझॉन इंडियाचा कार्यक्रम, सुरु असलेला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान लाखो लघु आणि मध्यम व्यावसायिक (एसएमबी) आपली असाधारण उत्पादने ग्राहकांसमोर प्रस्तुत करीत आहेत, त्यांना या कठीण काळामध्ये आपला व्यवसाय पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत करीत आहे. देशामधील ग्राहकांना हजारो अ‍ॅमेझॉन विक्रेत्याद्वारे प्रस्तुत अनेक असाधारण उत्पादने स्थानिक दुकाने, अ‍ॅमेझॉन लाँचपॅड, अ‍ॅमेझॉन सहेली आणि अ‍ॅमेझॉन कारीगर सारख्या कार्यक्रमांद्वारे खरेदी करण्याची आणि लाखो लघु व्यावसायिकांनी देऊ केलेले डील्स/ऑफर्स यांचा आनंद लुटण्याची संधी प्राप्त होत आहे.
    First published: