Amazon सोबत परदेशात वस्तू विकण्याची मोठी संधी, 'ही' आहे पद्धत

Amazon सोबत परदेशात वस्तू विकण्याची मोठी संधी, 'ही' आहे पद्धत

अमेझाॅनच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्रामबद्दल जाणून घेऊ.

  • Share this:

मुंबई, 02 मे : ई काॅमर्स क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी अमॅझोन. या कंपनीनं जगभरात आपली ओळख निर्माण केलीय. भारतीय उत्पादनांमुळे जागतिक बाजारपेठेत कंपनीनं चांगली प्रगती केलीय. जे भारतीय व्यापारी अमेझाॅनच्या ग्लोबल मार्केट प्लसच्या मदतीनं आपली उत्पादनं विकतात त्यांनाही फायदा झालाय. अमेझाॅनच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्रामबद्दल जाणून घेऊ.

CBSE Result : स्मृती इराणी आणि केजरीवाल यांच्या घरी निवडणुकीआधीच निकालाचे पेढे

या देशात विकू शकाल सामान - अमेझाॅनसोबत भारतीय व्यापारी आपलं उत्पादन उत्तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, युके, जर्मनी, स्पेन, इटली, फ्रान्स, जपान आणि आॅस्ट्रेलिया इथे विकू शकतात. अमेझाॅनच्या वेबसाइटवरच्या माहितीनुसार हा प्रोग्रॅम 2015ला लाँच केलाय. भारतीय व्यापाऱ्यांना यामुळे जगभरात आपल्या वस्तू नेणं सोपं जातं.

IAS अधिकारी बनण्यासाठी द्याव्या लागतात 'या' परीक्षा

2015मध्ये भारतात 100 विक्रेत्यांसोबत या प्रोग्रॅमची सुरुवात झाली होती आणि आता  50 हजार निर्यातदारांबरोबर 1 अब्ज डाॅलरचा टप्पा पार केलाय. कंपनी व्यापाऱ्यांना टॅक्सेशन, इमेजिंग, कॅटलाॅगिंग, कम्प्लायन्स, लाॅजिस्टिक यातही मदत करते.

बुरखा बंदी : या मुस्लीम शिक्षण संस्थेने विद्यार्थिनींसाठी काढला नवा फतवा

कसं करतात रजिस्ट्रेशन?

तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर https://services.amazon.in/services/amazon-global-selling/benefits.html यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. त्यात तुम्हाला तुमचा फोन नंबर, उत्पादनाची माहिती इत्यादी द्यावं लागेल. रजिस्ट्रेशनच्या 3 स्टेप्स आहेत.

1. तुमचा ग्लोबल अमेझाॅन अकाउंट रजिस्टर करा.

2. तुमच्या उत्पादनांची माहिती द्या.

3. जागतिक बाजारपेठेत तुमचं उत्पादन विकायला सुरुवात करा.

असंख्य लोकांपर्यंत तुम्ही सहज पोचू शकाल - यामुळे भारतीय व्यापारी जगभरातल्या ग्राहकांपर्यंत लवकर पोचू शकतात. तुम्ही सोप्या पद्धतीनं डाॅलर, पाउंड आणि युरोमध्ये कमाई करू शकता.

भारतीय उत्पादनांना जगभरात मागणी - अमेझाॅनच्या वेबसाइटनुसार 71 टक्के विक्री वाढलीय. गेल्या वर्षी दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा इथल्या राज्यांतून उत्पादनांना जास्त मागणी होती.

प्रियांका गांधींना चावणार होता साप, पाहा हा VIDEO

First published: May 2, 2019, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading