नवी दिल्ली, 04 जुलै: एका ऑनलाइन बुकस्टोअरच्या स्वरुपात अॅमेझॉनची (
Amazon) स्थापना करून आज जगभरातील एक नावाजलेला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून अॅमेझॉनची ओळख निर्माण करणारे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस (
Jeff Bezos), कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. 5 जुलै रोजी ते राजीनामा देणार आहेत. बेझोस यांच्या जागी अॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्यूटिंग बिझनेसचं संचालन अँडी जेसी (
Andy Jassy) करणार आहेत.
जवळपास 30 वर्षे मुख्य सीईओ पदावर राहिल्यानंतर बेझोस आता कार्यकारी अध्यक्षपदी नवीन भूमिका स्विकारतील. बेझोसने फेब्रुवारीच्या सुरूवातीला सांगितले की इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि त्यांची कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला Amazon चे सीईओ पद ते सोडत आहेत.
स्पेस फ्लाइट मिशनवर काम करत आहेत बेझोस
बेझोस सध्या त्यांच्या नव्या मिशनवर लक्ष्य केंद्रित करत आहेत. बेझोस सध्या स्पेस फ्लाइट (
Space Flight) मिशनवर काम करत आहेत. ते त्यांची कंपनी ब्लू ओरिजिन (
Blue Origin) द्वारे या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या स्पेस फ्लाइटमधून उड्डाण घेणार आहेत.
हे वाचा-62 लाख पेन्शनर्ससाठी Good News! पेन्शन रकमेसंदर्भात सरकारने घेतला हा निर्णय
20 जुलै रोजी अंतराळात उड्डाण भरेल न्यू शेफर्ड अंतराळयान
अलीकडेच इन्स्टाग्रामवर जेफ बेझोस यांनी अशी माहिती दिली होती की, त्यांच्या भावासह ब्लू ओरिजिनच्या 'न्यू शेफर्ड' अंतराळयानामध्ये 20 जुलै रोजी ते उड्डाण घेणार आहेत. या अंतरावारीमध्ये टेक्सास ते अवकाशात संक्षिप्त प्रवास केला जाणार आहे. अपोलो 11 च्या चंद्रावर आगमन झाल्याचा वर्धापनदिन 20 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यादिवशीच हे मिशन अंमलात येणार आहे.
हे वाचा-कल्पना चावला यांच्यानंतर भारतीय वंशाची 'ही' महिला करणार अंतराळात प्रवास
बेझोस यांनी असं म्हटलं होतं की, 'पृथ्वीला अंतराळातून पाहणं तुम्हाला बदलून टाकतं, या ग्रहाशी तुमचं नातं बदलून टाकतं. मी या फ्लाइटमध्ये चढू इच्छित आहे कारण ही अशी एक गोष्ट आह जी मला नेहमी करायची इच्छा होती. हा एक थरार आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.