अमेझाॅनची नव्या क्षेत्रात उडी, ग्राहकांना मिळणार 'हे' फायदे

अमेझाॅन नेहमीच काही नवं सुरू करत असते. आता त्यांच्या या सेवेचा फायदा ग्राहकांना मिळणार.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 08:22 PM IST

अमेझाॅनची नव्या क्षेत्रात उडी, ग्राहकांना मिळणार 'हे' फायदे

मुंबई, 22 मे : आधी छोटे दुकानदार आणि आता ट्रॅव्हल एजंटचाही व्यवसाय बंद होणार आहे. ई काॅमर्स कंपनी अमेझाॅननं क्लियरट्रिप ( ClearTrip )बरोबर आॅनलाइन ट्रॅव्हल बुकिंग क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलंय.आता अमेझाॅनच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटच्या पेजवर विमानाचं बुकिंग करू शकता. या पोर्टलवर तिकीट रद्द करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

दोन हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक

विमानाचं तिकीट बुक करायला कंपनी दोन हजारापर्यंत कॅशबॅक देतेय. अमेझाॅनच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 8 हजार रुपये किमतीची तिकिटं बुक केल्यानंतर अमेझाॅन प्राइम मेंबर्सना 800 रुपये कॅशबॅक आणि नाॅन प्राइम मेंबर्सना 400 रुपये कॅशबॅक मिळेल.

असं समोर आलं अनाजी पंतांचं कारस्थान, हत्तीच्या पायाखाली द्यायचं निघालं फर्मान

याशिवाय अमेझाॅनवर तुम्ही 8 हजारांपासून 19,999पर्यंत तिकिटं बुक केलीत तर अमेझाॅन प्राइम मेंबर्सना 1200 रुपये आणि नाॅन प्राइम मेंबर्सना 800 रुपये कॅशबॅक मिळेल.

Loading...

अमेझाॅन 20 हजार रुपयांहून जास्त तिकीट बुकिंगवर प्राइम मेंबर्सना 2 हजार रुपये कॅशबॅक आणि नाॅन प्राइम मेंबर्सना 1600 रुपये कॅशबॅक देईल.

'कोण होणार करोडपती?'मध्ये प्रेक्षकांसाठीही आहे 'ही' मोठी संधी

अमेझाॅनच्या या आक्रमक एंट्रीनं छोटे ट्रॅव्हल एजंट चिंतेत पडलेत. त्यांचं म्हणणं असं की अमेझाॅन भारतीय ट्रॅव्हल बाजारावर अतिक्रमण करतंय. Indian Association of Tour Operators अमेझाॅनसोबत कायदेशीर लढाई करायचा विचार करतेय.

निवडणूक निकालाच्या अगोदर शेअर बाजाराला सतावतेय 'ही' चिंता

अगोदरच मेक माय ट्रिप आणि यात्रा या वेबसाइट्समध्ये युद्ध सुरू आहेच. त्यात आता अमेझाॅनचीही स्पर्धा सुरू झालीय.


EVM ची रिक्षातून डिलेव्हरी? पाहा हा VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...