मुंबई,12ऑक्टोबर- हाती पैसे (Money) येताच सर्व पैसे खर्च करण्याची सवय बहुतांश लोकांना असते. परंतु, पैशांची बचत (Saving) करणं ही देखील एक कला आहे. ही कला एखाद्याला चांगली अवगत झाली तर त्याची सर्व समस्यांमधून सही सलामत सुटका होऊ शकते. युनायटेड किंग्डममधील 40 वर्षाची महिला कॉर्नी कार्डने (Corinne Card) ही कला तेव्हा अवगत केली जेव्हा तिच्यावर 18 लाखांचं कर्ज झालं होतं. काटेकोर बचतीचं प्लॅनिंग (Saving Plan) करत कॉर्नीनं सर्व कर्जाची परतफेड करून 16 लाखांची बचतही केली आहे.
ब्रिगटन (Brighton) येथे कुटुंबीयांसमवेत राहणारी कॉर्नी कार्ड एकदा आपल्या कुटुंबासमवेत पर्यटनाला (Tourism) गेली होती. टीव्ही खरेदी आणि घर सजावटीचे साहित्य क्रेडिट कार्डव्दारे खरेदी केल्यानंतर कॉर्नी कर्जबाजारी झाली होती. हे कर्ज (Loan) फेडण्यासाठी तिच्याकडे सेव्हिंग वापरण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. कॉर्नीनं यासाठी विशेष सेव्हिंग प्लॅन तयार केला.
असा होता सेव्हिंग प्लॅन-
कॉर्नी कार्डने तिच्याकडील 18 ते 19 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी स्ट्रिक्ट सेव्हिंग प्लॅन तयार केला. तिनं अनेक छोटे-मोठे खर्च कमी केले. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, तिनं बाहेर फिरण्यासाठी आणि बाहेर खाण्या-पिण्यासाठीचा खर्च कमी केला. बाहेरून जेवण मागवणं बंद केलं तसेच टीव्हीची खरेदीही रद्द केली. मीडिया कन्सल्टंसी एजन्सीमध्ये नोकरी करणाऱ्या कॉर्नीने आपले दैनंदिन कामाचे तास वाढवले आणि एक महिन्याच्या आत 5 लाखांच्या कर्जाची परतफेड केली. तिनं वर्तमानपत्रं, नियतकालिकं खरेदी करणं तसेच भेट वस्तूंवरील खर्च कमी केला. पती जॉनसोबत तिनं महिन्याचा खर्च कमी करण्यासाठी आवश्यक त्या वस्तूच खरेदी करण्यावर भर दिला आणि तातडीनं 13 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली.
(हे वाचा:आता करा खरेदी आणि पेमेंट महिनाभराने! वाचा काय आहे ही भन्नाट सुविधा)
3 मुलं असताना बचत करणं होतं अवघड-
कॉर्नी कार्डला 3 मुलं आहेत. त्यांच्यासाठी देखील खूप खर्च होत. या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी तिनं पती जॉनच्या मदतीनं जीवनशैलीत बदल करण्यासाठी एक तक्ता तयार केला. याबाबत कॉर्नी कार्डने सांगितलं की जेंव्हा मी क्रेडिट कार्डचा वापर सुरू केला तेव्हा कार्ड वापरल्यानंतर मी लगेचच कर्जाची परतफेड करत असे.’ तिला 10 वर्षाचा हॅरी, 7 वर्षाचा फ्रॅडी आणि 11 महिन्याचं एक अशी तीन मुलं आहेत. ती या सर्वांना घेऊन पर्यटनास गेली. यामुळे तिच्यावर 19 लाखांचं कर्ज झालं. अत्यंत काटेकोरपणे सेव्हिंग प्लॅन करत तिनं या सर्व कर्जाची परतफेड तर केलीच आणि 16 लाखांची बचतही साध्य केली.ही घटना नक्कीच प्रेरणादायक आहे. कोरोनाकाळात आपणही बचतीवर लक्ष केंद्रीत करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Pay the loan