मराठी बातम्या /बातम्या /मनी /होम लोनचा बॅलन्स ट्रान्सफर करताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा; करता येईल आर्थिक बचत

होम लोनचा बॅलन्स ट्रान्सफर करताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा; करता येईल आर्थिक बचत

जर तुम्ही होम लोन घेतलं असेल आणि त्याचा व्याज दर तुलनेनं जास्त असेल तर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर (Balance Transfer) करून चांगली बचत करू शकता.

जर तुम्ही होम लोन घेतलं असेल आणि त्याचा व्याज दर तुलनेनं जास्त असेल तर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर (Balance Transfer) करून चांगली बचत करू शकता.

जर तुम्ही होम लोन घेतलं असेल आणि त्याचा व्याज दर तुलनेनं जास्त असेल तर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर (Balance Transfer) करून चांगली बचत करू शकता.

  नवी दिल्ली 04 सप्टेंबर : आपलं घर असावं, असं स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. सध्याच्या काळात घर खरेदीसाठी बहुतांश लोक बँक किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून गृह कर्ज म्हणजेच होम लोन (Home Loan) घेतात. कोरोनामुळे रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. मात्र रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सध्या होम लोनचे दर त्यांच्या सर्वात खालच्या पातळीवर आले आहेत. जर तुम्ही होम लोन घेतलं असेल आणि त्याचा व्याज दर तुलनेनं जास्त असेल तर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर (Balance Transfer) करून चांगली बचत करू शकता. बॅलन्स ट्रान्सफर करताना महत्वाच्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बॅलन्स ट्रान्सफरविषयी सविस्तर माहिती `लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`नं दिली आहे. जाणून घेऊया त्याविषयी...

  ज्या व्यक्तींनी होम लोन घेतलं आहे, अशा व्यक्तींकडून बॅलन्स ट्रान्सफर वेळी बँका अतिरिक्त शुल्क (Extra Charges) वसूल करतात. तसेच यात कर्जाचा अवधी (Loan Period) हा घटकही महत्वाचा असतो. मात्र जर विचारपूर्वक व्यवहार प्रणाली ठेवली तर त्यातून तुम्हाला निश्चितच फायदा मिळू शकतो.

  मुंबईतील या बँकेवर RBI ची कारवाई, ठोठावला 50 लाखांचा दंड

  होम लोन हे सामान्यतः 20 वर्षांसाठी दिलं जातं. त्यामुळे बॅलन्स ट्रान्सफर करतेवेळी आपला कर्ज कालावधी किती राहिला, अजून किती वर्ष आपल्याला `ईएमआय` (EMI) भरायचा आहे, हे पाहणं आवश्यक आहे. 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी, 0.25 टक्के कमी व्याज दर, प्रक्रिया शुल्क आणि इतर खर्चाची जुळवणी करता त्यातून होणारी बचत अगदी नगण्य असते. मात्र जर होम लोनचा 10 ते 15 वर्ष कालावधी बाकी असेल आणि व्याजातील फरक 0.25 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर चांगली बचत शक्य आहे.

  जर तुम्ही होम लोनचा `ईएमआय` वेळेवर भरत असाल, आणि तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असेल तर तुम्ही तुमच्या बँकेसोबत होम लोनवरील व्याज दर (Interest Rate) कमी करण्याबाबत बोलणी करू शकता. यामुळे प्रक्रिया शुल्क आणि अन्य खर्चात बचत होऊ शकते. चांगला ग्राहक गमावणं हे कोणत्याही बँकेला परवडणारं नसतं. त्यामुळे बँक (Bank) तुम्हाला चांगली सूट देऊ शकते.

  Gold Price Today: घसरण होऊनही सोन्याचे दर 47 हजारांपार, चांदीला मात्र झळाळी

  सध्या अनेक बँका 6.65 टक्के व्याज दरानं होम लोन देत आहेत. त्यामुळे तुमची बँक किती व्याज दर आकारत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सध्या घेतलेल्या होम लोनवर व्याज दर इतर बँकांच्या तुलनेत जर 0.25 टक्क्यांनी अधिक असेल तरच तुम्हाला ते लोन ट्रान्सफर करणं फायद्याचं ठरू शकतं. याशिवाय बँका बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी प्रक्रिया शुल्कासह अन्य खर्चही वसूल करतात, कारण त्या याला नवं कर्ज मानतात. त्यामुळे बॅलन्स ट्रान्सफर करण्यापूर्वी या सर्व खर्चाची तुलना करता आपल्याला किती फायदा होतो हे तपासणं गरजेचं आहे.

  होम लोनचा बॅलन्स ट्रान्सफर करतेवेळी या तीन महत्वाच्या बाबींचा विचार केल्यास तुम्हाला निश्चित त्यातून फायदा होऊ शकतो.

  First published:

  Tags: Home Loan, Savings and investments